कोऱ्ह्याळे खु!,खांडज,वागज, सोनगाव,झारगडवाडी,मेखळी,बऱ्हाणपूर उंडवडी भागात वाळूला नाही कमी.., कारवाई होणार नसल्याची मिळतेय हमी? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

कोऱ्ह्याळे खु!,खांडज,वागज, सोनगाव,झारगडवाडी,मेखळी,बऱ्हाणपूर उंडवडी भागात वाळूला नाही कमी.., कारवाई होणार नसल्याची मिळतेय हमी?

कोऱ्ह्याळे खु!,खांडज,वागज, सोनगाव,झारगडवाडी,मेखळी,बऱ्हाणपूर उंडवडी भागात वाळूला नाही कमी.., कारवाई होणार नसल्याची मिळतेय हमी?                  बारामती:- बारामती तालुक्यातील नदीकाठची व ओढ्यालगत काही गावात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे, तश्या अनेक स्थानिक रहिवाशांनी तक्रारी देखील केल्याचे समजते, मात्र कारवाईच होत नसल्याने तक्रार करणारे पुढे येण्यास तयार होत नाही अशीही माहिती मिळतेय, मंडल अधिकारी व तलाठी यांचेकडे तक्रार करण्याची वेळ येते पण त्यांना त्या गावात काम करीत असताना ही वाळू व मुरूम, माती वाहतूक होतेय हे माहीत नसावं हे आश्चर्य असल्याचे बोलले जातंय, महसूल विभाग याकडे का कानाडोळा करीत आहे हे समजले नसले तरी लोकांच्या ते लक्षात येतंय हे विसरून चालणार नाही, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन देऊन हलगर्जी पणा करणाऱ्या अधिकारी यांच्या वर कारवाई करण्यासाठी मागणी करणार असल्याचे ही समजले. याबाबत ज्या गावात अशी अवैध वाळू, मुरूम वाहतूक होताना दिसेल त्या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना कळविल्यास नक्की कारवाई होऊ शकते त्याच बरोबर अश्या काही भागातील उत्खनन बाबत माहिती अथवा फोटो काढल्यास ते प्रसिद्ध करण्यात येईल व संबंधित चुकीचे काम करणार्यांवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा केला जाईल.यासंबंधी ज्या गावात मंडलअधिकारी व तलाठी कारवाई करणार नसल्याचे दिसेल त्या ठिकाणच्या अधिकारी यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर कारवाई केली जाईल का? असेही बोलताना नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यानंतर अजून काही गावात अश्या पद्धतीने वाळू व मुरूम उत्खनन चालू असल्याने त्यावर देखील कारवाईची मागणी होणार आहे.

No comments:

Post a Comment