आरएचपी हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांची कामगिरी अभिमानस्पद - संतोष शिंदे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

आरएचपी हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांची कामगिरी अभिमानस्पद - संतोष शिंदे

*आरएचपी हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांची कामगिरी अभिमानस्पद - संतोष शिंदे*

कोंढवा, पुणे:- गोरगरीब नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधोपचार मिळावेत, रुग्णांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून जनजागृती आणि प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या उमेश चव्हाण यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना हॉस्पिटलमध्ये सहज उपचार मिळवून दिले, मात्र आज त्यांनी स्वकर्तुत्वावर एक मोठ्या हॉस्पिटलची केलेली निर्मिती प्रेरणादायी आणि अभिमानस्पद असल्याचे गौरवोद्गार संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक संतोष शिंदे यांनी काढले.
       जिजाऊ, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून उमेश चव्हाण यांची समाजात ओळख आहे. मात्र सत्ता किंवा कोणाच्याही मदतीशिवाय, पाठिंब्याशिवाय केवळ आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ठरवलं तर एक मोठे हॉस्पिटल निर्माण करता येते, असेही संतोष शिंदे म्हणाले. 
       उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कोंढवा येथे रूग्ण हक्क परिषदेने निर्माण केलेल्या "आरएचपी हॉस्पिटलची" रचना अत्यंत दर्जेदार, सुंदर, देखणी, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली अशीच आहे. उद्घाटन पूर्व पाहणी करून संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी आरएचपी हॉस्पिटल उभारणी बाबत उमेश चव्हाण यांची कामगिरी अभिमानस्प असल्याचे गौरोवोद्गार काढले.

No comments:

Post a Comment