पोलीसाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनने पकडले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 28, 2021

पोलीसाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनने पकडले..

पोलीसाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनने पकडले..

अहमदनगर:-नुकताच घडलेल्या घटनेत दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 20
हजाराची लाच मागून 10 हजार रुपये लाच
घेणार्या पोलीस कर्मचाऱ्याला अहमदनगर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शनिवारी (दि. 27) श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात केली. संजय किसन दुधाडे (वय-38) असे लाच घेतान रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस
कर्मचार्याचे नाव आहे. संजय दुधाडे हे पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील हेरगाव येथील 55 वर्षाच्या व्यक्तीने अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दुधाडे हे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत.तक्रारदार यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस छेड खाणीचा गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी संजय दुधाडे याने तक्रारदार यांच्याकडे शुक्रवारी (दि. 26) 20 हजार रुपये लाच मागितली.तडजोडीमध्ये 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते.तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने शनिवारी (दि.27) पंचासमक्ष पडताळणी केली.त्यावेळी संजय दुधाडे याने 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन 10 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना दुधाडे याला रंगेहात पकडले.दुधाडे याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने ,अपर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी,सचिन गोसावी, पोलीस नाईक प्रभाकर गवळी,पोलीस कॉन्स्टेबल वैभव पांढरे, रवींद्र निरमसे,चालक पोलीस नाईक विजय गंगूल, पोलीस हवालदार संतोष गांगुड्डे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment