"आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात'.. वाहन चालक मालक मेळाव्यात रमेश समुखराव यांनी दिला इशारा.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 1, 2021

"आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात'.. वाहन चालक मालक मेळाव्यात रमेश समुखराव यांनी दिला इशारा....

"आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात'.. वाहन चालक मालक मेळाव्यात रमेश समुखराव यांनी दिला इशारा....                                बारामती(संतोष जाधव):- ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कामगार नेते मा.रमेशजी समुखराव साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून वाहन चालक व मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र मा.रमेशजी समुखराव साहेब हे वाहन चालकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार व न्याय हक्कासाठी उपोषण आंदोलन मोर्चे निदर्शने करणार असून राज्यात व देशाच्या इतर राज्यांमध्ये असे सातत्याने कार्यक्रम करत असतात वाहन चालक मालकांच्या विकासासंदर्भात विविध मागण्या घेऊन मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे,भारतात इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे म्हणून वाहन चालक व मालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व वाहन चालक मालक यांच्यासाठी आयोग नेमावा, महामंडळ नेमावा,असे अनेक मुद्दे घेऊनव वाहन चालक मालक हा देशाचा दुसरा तिसरा महत्वाचा घटक आहे, म्हणूनच इशारा देताना म्हणाले"आम्ही आहोत, म्हणून तुम्ही आहात" रमेशजी समुखराव साहेब यांनी महाराष्ट्र व इतर राज्यात संपर्क अभियान चालू केले आहे त्याचाच भाग म्हणून दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा बारामती तालुका येथे वाहन चालक मालक महामेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,सदर कार्यक्रमास ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रमेशजी समुखराव साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते,यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली, मुंडे ताई यांनी वाहन चालवताना आपण सुद्धा कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले तर ऍड सुप्रिया ताई यांनी वाहन चालक यांच्यावर येत असलेल्या कायदेशीर बाबी कश्या पद्धतीने सोडविता येथील,विमा पॉलिसी का आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रम बारामती तालुका व पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या
संयुक्त सहभागाने आयोजित केला होता यावेळी श्री.नंदकुमार नामदास  (सचिव महाराष्ट्र प्रदेश ),श्री.राजेंद्र जगताप  (सचिव महाराष्ट्र प्रदेश ),सल्लागार मुंढे ताई, ऍड सुप्रिया ताई बर्गे, साळवी ताई ,मा. उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड,श्री.दत्तात्रेय फालके(बुवा)(सचिव पश्चिम महाराष्ट्र )श्री.काशिनाथ लेंगरे (अध्यक्ष पुणे जिल्हा) श्री.संतोष जाधव (प्रसिद्धीप्रमुख पुणे जिल्हा)श्री.सोमनाथ पारसे(सचिव पुणे जिल्हा)श्री.संतोष मरके (अध्यक्ष पिंपरी- चिंचवड विभाग पुणे)सह पदाधिकारी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संताजी गायकवाड, तालुका अध्यक्ष अनिल(बाळासाहेब)गायकवाड,नंदकुमार बोराटे,अन्वर शेख,चव्हाण,केशव खंडाळे सह कार्यकर्ते यांनी केले होते.

No comments:

Post a Comment