शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विक्री करणार्यांवर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 9, 2021

शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विक्री करणार्यांवर गुन्हा दाखल..

शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विक्री करणार्यांवर गुन्हा दाखल..                  बारामती:- आजकाल तरूण पिढीमध्ये शरीर बनवण्याचे वेढ वाढलेले आहे त्यासाठी काहीही करावयाची त्यांची तयारी आहे.त्यासाठी डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे, काही इंजेक्शन घेणे यासारखेसुदधा प्रकार केले जातात
परंतु त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. चित्रपट व टेलिव्हिजनमधील हिरोसारखे दिसणारे शरीर बनवण्याचा पपन होतो परंतु त्यामुळे शरीराची खुप मोठया प्रमाणावर हानी होत आहे.मध्यंतरी काही बॉडीविल्डर लोकांचा
जिममध्ये व्यायाम करताना मृत्यु झाल्याच्या घटना सुदधा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचल्या आहेत आणि त्याचे लोन आता ग्रामीण भागात सुदधा पसरत आहे. असाच एक इसम नामे प्रदिप सुरेश सातव रा.कसबा बारामती हा जिम करणारे लोकांना शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असलेची माहिती मिळालेवरून सदर माहितोचे आधारे सापळा रचून सदर इसमास त्याची क्रेटा गाडी क.एम.एच.०२ डी.झेड.७२८६ सह पकडून त्याची व  गाडीची झडती घेतली असता एकुण २० इंजेक्शन बॉटल मिळुन आले आहेत सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर रक्त पुरवठा नियंत्रित करण्यासाठी व दुखवटा कमी करणेसाठी वापरले जाते परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम
केलेनंतर सुस्ती न येणेसाठी केला जातो सदरचे औषध हे शरिरावर दुष्परिणाम करणारे असलेचे औषध निरीक्षक यांनी सागितले,सदरची औषधे ही कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसुन ते बारामतीमधील जिमला विकले जात
असलेने तात्काळ औषध निरीक्षक यांना बोलावून सदर औषधे ही पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली आहेत. त्याअन्वये बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६१३ / २०२१ भा.दं.वि.कलम १७५,२७६,३२८,३३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर इसमाकडून २६८/-रु प्रमाणे २० बॉटल्स किंमत अंदाजे ५,३६०/-रु तसेच एक काळे कलरची हयुडाई कंपनी क्रेटा गाडी क्र.एम.एच.०२ डी.झेड.७२८६ किंमत अंदाजे ९,००,००० / - रु. असा एकुण ९.०५,३६०/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे तसेच सदर औषध कोठून आणली व अजून कोणा-कोणाला विकली आहे याचा पुढील तपास पोसई गणेश पाटील हे करीत आहेत.तरी तरूणपिढीला आव्हान आहे कि,शरीर नैसर्गिकरित्या कमवा कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा मण्टिमेंट डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेवु नका त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात इंजेक्शनामुळे शरीर जरी देखणे दिसत असले तरी ते आतून स्नायू कमकुवत करत असते.सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक.डॉ.श्री. अभिनव देशमुख., अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते ,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री.गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक ,पोसई गणेश पाटील,पोसई युवराज घोडके,सफौ संजय जगदाळे ,पोहवा रामचंद्र ,पोहवा अभिजित कांबळे पीना दशरथ कोळेकर ,पोका बंड़ कोठे, पोकां अजित राउत,पोकों. दशरथ इंगोले पोकान कोकणे पोकों मनोज पवार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment