बारामती तालुक्यातील तलाठीवर दहा हजाराची लाच घेताना कारवाई... निंबुत:- येथील तलाठयावर लाच स्वीकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/पुणे घटक यांनी नुकताच कारवाई केली,वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम
गुन्हा नोंद क्रमांक कलम पुरूष, वय - ४८ वर्षे
लोकसेवक - मधुकर मारूती खोमणे, वय - ५८ वर्षे यांच्या विरोधात तक्रारदार यांनी माहिती दिली होती,आरोपी तलाठी म्हणून निंबुत ता. बारामती जिल्हा पुणे येथे कामावर होता,त्याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची रक्कम मागणी केली १०.०००/ हजार रुपये रक्कम घेत असताना पडताळणी व सापळा रचून दिनांक - दि. १७/११/२०२१ तलाठी कार्यालय सजा निंबुत ता. बारामती येथे यातील तक्रारदार यांचे वडीलांचे नावे असलेल्या जमिनीचे क्षेत्र
दुरूस्ती नोंद करण्यासाठी आरोपी लोकसेवक यानी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपयांची लाच मागणी करून १०,०००/- रूपयांची लाच रक्कम स्वीकारल्यावर त्यास ताब्यात घेण्यात आले असून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.लाप्र.वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक संदीप वन्हाडे तपास करत आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे, ला.प्र. वि. पुणे
परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे व श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
२. अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे - दुरध्वनी क्रमांक - ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
३. व्हॉट्स-अॅप क्रमांक पुणे - ७८७५३३३३३३
५. ई-मेलआयडी - पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in
$. daama a www.acbmaharashtra.gov.in
७. ऑनलाईन अॅप तक्रार - www.acbmaharashtra.net.in
४. व्हॉट्स-अंप क्रमांक मुंबई - ९९३०९९७७००
(श्रीहरी पाटील)
सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उप-अधीक्षक (प्रशासन)
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे.
ब्युरो,
No comments:
Post a Comment