पीडित महिलेचा बारामतीच्या मा. नगराध्यक्ष व मा. उपनगराध्यक्ष यांच्यावर शारीरिक शोषण केलेप्रकरणी कारवाईसाठी आमरण उपोषणाचा इशारा? पुणे(प्रतिनिधी):-पीडित महिलेचा मा. नगराध्यक्ष व मा. उपनगराध्यक्ष यांनी शारीरिक शोषण केलेप्रकरणी कारवाईसाठी आमरण उपोषणाचा इशारा देणारे पत्र बिबवेवाडी पोलीस स्टेशनला देण्यात आले, बारामती या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला होता याआनुसंगाने दि.१५/११/२०२१ रोजी या पीडित महिलेने तसा प्रयत्न केला असता बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी तो हाणून पाडला व त्या पीडित महिलेला समजावून सांगून कायदेशीर मार्गाने न्याय मागा आत्मदहन हा पर्याय नाही असे सांगून पीडित महिलेकडून लेखी लिहून घेतले,पुणे येथील बिबवेवाडी येथे पोलीस स्टेशनला १३ वर्षे शारीरिक शोषण करणारे मा. नगराध्यक्ष व मा. उपनगराध्यक्ष यांच्यावर कारवाईसाठी लेखी पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास दि.१८/११/२०२१ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले.
Post Top Ad
Wednesday, November 17, 2021
Home
ताज्या घडामोडी
पुणे
पीडित महिलेचा बारामतीच्या मा. नगराध्यक्ष व मा. उपनगराध्यक्ष यांच्यावर शारीरिक शोषण केलेप्रकरणी कारवाईसाठी आमरण उपोषणाचा इशारा?
पीडित महिलेचा बारामतीच्या मा. नगराध्यक्ष व मा. उपनगराध्यक्ष यांच्यावर शारीरिक शोषण केलेप्रकरणी कारवाईसाठी आमरण उपोषणाचा इशारा?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment