मुख्याधिकारी यांनी 1लाख 26 हजारांची मागितली लाच..अँटी करप्शनकडून गुन्हा दाखल.. माळशिरस(प्रतिनिधी):-सध्या विकास कामाचा सपाटा चालू असून रस्त्याची कामे चालू आहे, अश्यातच रस्त्याच्या कामाचे बिल काढल्यानंतर ठेकेदाराला 1 लाख मागितल्याप्रकरणी
26 हजारांची माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB)जाळ्यात सापडले आहेत. विश्वनाथ दिगंबरराव वडजे असं लाच मागितलेल्या मुख्याधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी वडजे विरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.याबाबत माहिती अशी, माळशिरसमधील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे काम सांगलीच्या एका ठेकेदाराने केले होते.त्याच्या कामाचे बिल माळशिरस मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी ठेकेदाराच्या बँक खात्यावर जमा केले होते.बिल जमा केल्याच्या मोबदल्यात वडजे यांनी बिलाच्या 3 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली.यानंतर ठेकेदाराने 30 सप्टेंबर रोजी सांगलीच्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.दरम्यान, 22 ऑक्टोबर रोजी व 1 नोव्हेंबर
रोजी वडजे यांच्याविरोधात एसीबी पथकाने सापळा रचला होता. याची कुणकुण यांना लागली होती.त्यामुळे वडजे यांनी ठेकेदाराकडून लाच घेतली नाही. पण, लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरूद्ध 17 नोव्हेंबर रोजी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे , अविनाश सकपाळ, संजय सागर, अजित पाटील,प्रितम चौगुले,संजय कलगुटगी, चालक
बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment