सोनगाव मधील मंगलेश भोसले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी जमावाने पोलिसांवर केले गंभीर आरोप..! पीएम रिपोर्ट आल्यानंतर सत्य परिस्थिती पाहून गुन्हा करणार दाखल-अप्पर पोलीस अधीक्षक.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 26, 2021

सोनगाव मधील मंगलेश भोसले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी जमावाने पोलिसांवर केले गंभीर आरोप..! पीएम रिपोर्ट आल्यानंतर सत्य परिस्थिती पाहून गुन्हा करणार दाखल-अप्पर पोलीस अधीक्षक.!

सोनगाव मधील मंगलेश भोसले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी जमावाने पोलिसांवर केले गंभीर आरोप..!                    पीएम रिपोर्ट आल्यानंतर सत्य परिस्थिती पाहून गुन्हा करणार दाखल-अप्पर पोलीस अधीक्षक.!                                                                                                                      बारामती : नुकताच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती तालुका व शहरात अवैद्य धंदे बंद पाहिजे असे बोलून भर सभेत त्यांनी पोलीस अधिकारी यांना सुनावले होते, तेव्हापासून पोलिसांनी धडक मोहीम राबवून तालुक्यातील व शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी कारवाई सुरू केली होती,अशीच मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी बारामती तालुक्यातील सोनगाव या ठिकाणी दारू विक्री करीत असल्याचे संशय आल्याने कारवाई करताना या कारवाईचा भीतीपोटी एकाचा जीव गमवावा लागला याबाबत मिळालेली माहिती असे की, पोलिसांच्या भीतीमुळे निरा नदीच्या पाण्यात उडी टाकल्याने दम लागून मृत्यूमुखी पडलेल्या मंगलेश भोसले याच्या मृत्यूनंतर त्याच्या वस्तीवरील जमाव कमालीचा संतप्त झाला आहे.या जमावाने शुक्रवारी रात्री उशीरा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटी निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला होता. सुमारे शेकडो जणांचा जमाव येथे जमला होता. अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता. सहयोग सोसायटीबाहेर तणावाचे वातावरण झाले होते पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणाव शांत केला, मंगलेश भोसले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी या जमावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. मंगलेश हा शेळी चारण्यासाठी गेला होता. पोलिसानी दारु विकत असल्याच्या कारणावरुन मारहाण सुरु केल्याने त्यांच्या
भितीपोटी मंगलेश याने जीव वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी टाकून पळण्याचा प्रयत्न केल्याचे सहयोग भवन बाहेर जमलेल्या जमावाने सांगितले. या प्रकरणी संबधित पोलिसांवर खूनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका जमावाने घेतली आहे.दरम्यान शहर पोलिसांनी या जमावाला येथून पांगवले.त्यानंतर रात्री उशीरा त्यांनी येथून ग्रामीण पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या देत आम्हाला न्याय द्या असा टाहो फोडत होते,याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी या जमावाचे म्हणणे ऐकून घेतले व याबाबत पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यावर खरी परिस्थिती पाहून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले, रात्री उशिरापर्यंत जमाव पोलीस स्टेशनमध्ये थांबला होता व एकच मागणी करीत होता गुन्हा दाखल करून घ्या,जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबातील व्यक्ती ठाम असल्याचे दिसत होते, पारधी समाजाला नेहमीच किड्या मुंगीसारखे जीवन जगावं लागते,नोकऱ्या नाही,काम धंदे नाहीत फक्त गुन्हेगारी सारखं जीवन जगण्याची वेळ येत आहे अश्या भावना व्यक्त करण्यात येत होत्या,मंगलेश याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुई ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून तेथेही पोलिस फौजफाटा तैनात होता.या संबधीत घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या, महाराष्ट्रातील भटके विमुक्त आदीवासी महासंघाचे वतीने या समाजाला न्याय द्या या मागणीचे निवेदन देणार असल्याचे समजले.

No comments:

Post a Comment