संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणच्या सदस्यपदी अॅड. प्रदीप वळसे पाटील - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 28, 2021

संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणच्या सदस्यपदी अॅड. प्रदीप वळसे पाटील

संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणच्या सदस्यपदी अॅड. प्रदीप वळसे पाटील 
लोणी धामणी(वार्ताहर -कैलास गायकवाड ):- 
संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणच्या सदस्यपदी भिमाशंकर शिक्षण संस्थेचे खजिनदार व निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांची निवड झाल्याचे पत्र संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिले. 
वळसे पाटील हे सन २०१० पासून निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून तर सन २०१३ पासून भीमाशंकर शिक्षण संस्थेचे खजिनदार म्हणून कार्यरत असून दोन्हीही संस्थांचे जडणघडणीत महत्वाचे योगदान असून त्यामुळे संस्थांचा नावलौकिक झालेला आहे. या दोन्ही संस्थामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून दर्जा वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. उत्कृष्ट  व्यवस्थापनामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय बाबींची दाखल घेवून त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.
संस्थाचालक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सतिशमामा खोमणे व देवेंद्र बुट्टे पाटील असून खजिनदार प्रकाश बोरा, सचिव शिवाजीराव घोगरे, सहसचिव महेश ढमढेरे म्हणून कार्यरत आहेत. संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment