केडगाव प्रतिनिधी :- नवनाथ खोपडे,
केडगाव:- नोकरीच्या मागे न लागता दौंड तालुक्यातील खोर गावचा सागर सणस याने अगदी दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या खोरच्या डोंगरावर अंजीराची तीस गुंठे शेतात दिडशे अंजीराची झाडे लावली असून अगदी फळांनी बहरून आलेला बाग आहे.
सणस या तरुणाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की सध्या अंजीर साठ रुपये प्रति किलो जात असून विक्रीसाठी बाहेर घेवून जाण्याची गरज नाही कारण बरेच व्यापारी अंजीर बागेत येवून घेऊन जात आहे.या बागेत कमीत कमी दहा ते पंधरा लाखा पर्यंत उत्पादन निघेल असा अंदाज आहे.एकदा अंजीराची लागवड केल्यानंतर कमीत कमी ही बाग २०ते २५ वर्ष चालू शकते पण ही बाग जपताना मात्र रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे.अंजीरला बाजारभाव कोणत्या वेळी मिळेल याचा अंदाज घेऊन बाग धरला जातो.
ही अंजीराची बाग पाहत पाहत अंजीर रोपे इतर फळ रोपांची नर्सरी सुध्दा सुरू केली आहे.अंजीराची झाडांची लागवड करून देण्यापासून ते छाटणी कशी करावी? फळे तोडणी ते फळांची पॅकिंग कशी करावी?या बाबत मार्गदर्शन देखील करीत आहे.आमचा जो भाग आहे तो तसा पाहिला तर दुष्काळी, डोंगराळ आहे कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घेता येईल हाच दृष्टिकोन ठेवून फळबाग शेती करत आहे असे ही सागर सणस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment