चक्क..बारामतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन महिलेने केली पाऊने दहा लाखाची फसवणूक.. गुन्हा दाखल. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 18, 2021

चक्क..बारामतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन महिलेने केली पाऊने दहा लाखाची फसवणूक.. गुन्हा दाखल.

चक्क..बारामतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन महिलेने केली पाऊने दहा लाखाची फसवणूक.. गुन्हा दाखल.

बारामती:- बारामतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक व कॉन्ट्रॅक्टर असलेल्या राजेंद्र(आबा)बनकर यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी कविता अमोल जावळे (रा. बिबवेवाडी, पुणे)या महिलेविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कविता जावळे स्टेट बँकेत नोकरी करीत होती. दि 13 मार्च 2018 ते 31डिसेंबर 2019 दरम्यान व जुलै 2021 मध्ये कविता जावळे यांनी फिर्यादी बनकर यांना कॉन्ट्रॅक्टच्या कामाकरिता कर्ज प्रकरण मंजूर करुन देण्यासाठी व त्यांच्या दोन भाच्यांना बँकेत नोकरी लावून देण्यासाठी म्हणून बनकर यांच्याकडून वेळोवेळी 9,76,500/- रु. घेतले. परंतु जावळे यांनी कर्ज प्रकरण मंजूर केले नाही व त्यांच्या भाच्यांना नोकरीलाही लावले नाही. त्यामुळे बनकर यांनी त्यांना दिलेली रक्कम परत मागितली असता ती त्यांना परत न देता त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बनकर यांची आर्थिक फसवणूक केली आहे.पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक पालवे करीत आहेत.

No comments:

Post a Comment