रुग्ण हक्क परिषदेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 12, 2022

रुग्ण हक्क परिषदेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन!

रुग्ण हक्क परिषदेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन!

पुणे :- स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने पुर्णत्वास आणणाऱ्या महामाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती निमित्ताने रुग्ण हक्क परिषदे तर्फे यंदाही यंदाही पुण्यातील लाल महालातील जिजाऊंच्या  अर्धपुतळ्यास परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
         यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने लाल महाल राष्ट्रीय स्मारक  झालाच पाहिजे," अशा घोषणा देण्यात आल्या. गेली अकरा वर्षे आम्ही सातत्याने लाल महालाचा विकास झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी करत असल्याचे रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
      यावेळी संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव अपर्णा साठे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सलीम आळतेकर, उप-सचिव गिरीश घाग, संजय जोशी आणि विजय लांडे प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment