सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोबाईल चोरटा जेरबंद... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 27, 2022

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोबाईल चोरटा जेरबंद...

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोबाईल चोरटा जेरबंद...

बारामती:- बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये सॅमसंग ए 12 कंपनीचा किंमत पंधरा हजार रुपये असणारा मोबाईल चार्जिंग ला लावलेला असताना माने टायर वर्क पंतशहा नगर रिंग रोड या ठिकाणावरून अज्ञात चोरट्याने चोरून नेला म्हणून गुन्हा नंबर 34/ 22 कलम 379 भा द वी  प्रमाणे दाखल होता. सदर बाबत उघड्या दुकानातून हा मोबाईल नेणारा  चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असेल बाबत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेश दिले त्याप्रमाणे त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही पाहणी केली असता चोरटा दिसून आला .त्यानंतर पथकांच्या खबरी मार्फत त्याची ओळख पटवण्यात आली त्याचे नाव निलेश तुकाराम गोसावी वय 40 वर्ष राहणार भैरोबा मंदिर तांदुळवाडी तालुका बारामती असे असल्याचे निष्पन्न झाले त्याला पोलीस ठाण्यात आणताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व मुद्देमाल ही काढून दिला सदर आरोपीने आणखी काही मोबाईल चोरले आहे का याबाबत पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस अंमलदार तुषार चव्हाण, शिंदे, अभिजीत कांबळे ,दशरथ कोळेकर, कोठे हे तपास करत आहेत.
यापुढे सर्व व्यापारी वर्गास विनंती आहे की सीसीटीव्ही फुटेज एक कॅमेरा आपण आपल्या दुकानासमोरील रोडवर जर लावला तर गुन्ह्याची उकल होण्यास निश्चित मदत होईल पोलीस आपल्याकडे सीसीटीव्ही पाहण्यास येथील एवढा त्रास जर सोडला तर सर्व व्यापारी व रहिवासी हे कित्येक पटीने सुरक्षित होतील. कारण सीसी टीव्ही मुळे निश्चित चोरी मध्ये घट होईल. महिलेवर चाकू हल्ला करणारा इसम सुद्धा सीसीटीव्हीत कैद झालेला आहे परंतु त्याची ओळख अद्याप पटलेली नाही परंतु निश्चितपणे काही दिवसातच तोही गजाआड झालेला असेल. तरी सर्वांनी सुरक्षेच्या कारणासाठी सीसीटीव्ही आपापल्या दुकानांना शक्य असल्यास सोसायट्यांच्या बाहेर मेन गेटवर बसवावे ही विनंती करण्यात आली.

No comments:

Post a Comment