लोणावळा येथे सौ अमृताताई फडणवीस यांच्या हस्ते ३०० कन्यांना सुकन्या पासवुक वितरीत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 1, 2022

लोणावळा येथे सौ अमृताताई फडणवीस यांच्या हस्ते ३०० कन्यांना सुकन्या पासवुक वितरीत...

लोणावळा येथे सौ अमृताताई फडणवीस यांच्या हस्ते ३०० कन्यांना सुकन्या पासवुक वितरीत...
लोणावळा:- भारतीय टपाल विभाग पुणे ग्रामीण मार्फत राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दि २२ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान १० वर्षांच्या मुलींच्या सुकन्या समृद्धी खात्यासाठी विशेष अभियान राबविले गेले व या अभियानास लोणावळा नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव यांनी मदत करीत त्यांनी लोणावळा येथील १० वर्षांखालील मुलींची ३०० खाती उघडून दिली. सुकन्या खाते हे मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त असून त्याची रक्कम उच्च शिक्षणासाठी व मुलीच्या लग्नासाठी मिळते.
३१ जानेवारी २०२२ रोजी लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव यांच्या सहकार्याने सुकन्या समृद्धी योजनेची लोणावळा पोस्ट कार्यालयात ३०० खाती उघडण्यात आली व त्याची पासबुक सौो अमृताताई देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व श्री बी पी एरंडे अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग व नगरसेवक/नगरसेविका व पोस्टल स्टाफ लोणावळा यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आली. तसेच सौ अमृताताई फडणवीस यांना डाक विभागातर्फे माय स्टॅम्प भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.श्री बी पी एरंडे अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण यांनी सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका यांना आवाहन केले आहे कि आपण बेटी बचाव,बेटी पढाव अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधीक्षक डाकघर पुणे
ग्रामीण पुणे ४११००५ यांच्याशी संपर्क करावा, तसेच पोस्टातील जनतेच्या हिताच्या सर्व सुविधांचा फायदा घ्यावा.सदर कार्यक्रमास श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्ष ,श्री रामविलास खंडेलवाल शहराध्यक्ष भाजपा, श्रीमती रचना सिनकर सभापती आरोग्य समिती, श्रीमती मंदाताई सोनवणे नगरसेविका, श्री देविदास कडू नगरसेवक, श्री ललित सिसोदिया नगरसेवक
तसेच लोणावळा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री माणिक जाधव, डाक सहाय्यक सिद्धार्थ आढेकर, पोस्टमन श्री विवेक थोरवे,श्री दत्तात्रय मोरे व श्रीमती सुवर्णा खोपडे इ.उपस्थित होते.

No comments:

Post a Comment