धामणी चे महापौर्णिमा यात्रा उत्साहात साजरी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 18, 2022

धामणी चे महापौर्णिमा यात्रा उत्साहात साजरी

धामणी चे महापौर्णिमा यात्रा उत्साहात साजरी 

लोणी-धामणी : प्रतिनिधी -(कैलास गायकवाड )दिः१८/०२/२०२२.:-कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षे बंद असलेली व प्रादूर्भाव कमी झाल्याने धामणी (ता.आंबेगाव) येथील म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा दोन दिवस मोठ्या उत्साहाने व आनंदाने पार पडली. यात्रेच्या दुसर्या दिवशी पूणे जिल्यासह नगर जिल्ह्यातून नामवंत पैलवानांनी हजेरी लावून आंबेगाव तालुक्यातील यात्रेनिमित्त भरलेला पहिलाच कुस्त्यांचा आखाडा चांगलाच रंगवला. या आखाड्यात ५० रुपयापासून २ हजार ५०० रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात आली. या कुस्त्यांचा आखाड्यात पंच म्हणून पहिलवान गोरक्षनाथ सासवडे,अतुल धुमाळ, सुनील जाधव,नितीन जाधव यांनी कामगिरी पाहिली.यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेलें,सरपंच सागर जाधव,यात्रा कमिटी अध्यक्ष गजाराम जाधव,उपसरपंच मिलिंद शेळके, ह.भ.प.संतोष बढेकर,ज्ञानेश्वर विधाटे,विलास पगारीया,शांताराम जाधव,आण्णा बोऱ्हाडे,लक्ष्मण काचोळे,विजय जाधव,रामदास जाधव,वामन जाधव,अविनाश बढेकर,आनंदा जाधव,शरद जाधव,रंगनाथ जाधव,मोहन जाधव व मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन व ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment