जुगार अड्ड्यावर छापा,१२ जणांना ताब्यात घेत,८२९४० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 4, 2022

जुगार अड्ड्यावर छापा,१२ जणांना ताब्यात घेत,८२९४० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.!

जुगार अड्ड्यावर छापा,१२ जणांना ताब्यात घेत,८२९४० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.!                                                                  बारामती:- बारामती शहर व तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाईचा सपाटा चालू असून नुकताच बारामती शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने छापा टाकत तब्बल बारा जणांना ताब्यात घेतले असून, ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी आप्पासो सोपान दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी फारुक बबन बागवान यांच्यासह इकबाल
निजाम जमादार,वय.६५ वर्षे (रा.पतंगशहानगर, ता. बारामती,जि. पुणे) सलीम बालेसाहब शेख, वय.३० वर्षे (रा.जोगेश्वरी पार्क,प्रतिभानगर,बारामती) सागर पोपट कांबळे,वय.३४ वर्षे (रा.पोस्ट ऑफिस समोर आमराई,बारामती),विजय दिलीप शेलार,वय.३५
वर्षे (रा. चंद्रमणीनगर, आमराई,बारामती) सिकंदर कादर इनामदार,वय.४८ वर्षे (रा.जगताप,कसबा,बारामती) विनोद सुभाष सोनवणे,वय.४० वर्षे (रा.एस.टी.स्टँड समोर, आमराई,बारामती), युनूस सलीम शेख,वय.३४ वर्षे ( रा.पानगल्ली, बारामती) उमेश कुमार
पारसे, वय.३१ वर्षे (रा.सटवाजीनगर, बारामती),निरंकार दादासाहेब पोटे,वय.२२ वर्षे (रा.खाटीकगल्ली,बारामती बापूराव बाळासाहेब आटोळे,वय.५५ वर्षे (रा.ढेलेवस्ती,गुणवडी,बारामती)युनूस जाफर मुजावर,वय.५५ वर्षे (रा.लेंडी पट्टा,कसबा,बारामती) अशा १२ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४,५ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्यांच्या ताब्यातील ६१ हजारांचे ११ मोबाइल व २१ हजार ९४० अशी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी,यांना बातमी दारामार्फत बातमी मिळाली की,बारामती शहरातील म्हाडा कॉलनी,शिवाजी चौक येथे श्रीमती सायराबानु राजन पठान (रा.म्हाडा कॉलनी गुणवडी रोड) यांच्या मालकीच्या खोलीत संशयित आरोपी फारूख बागवान हा त्याच्या ओळखीच्या लोकांना एकत्रित करून पैशावर तीनपत्ते जुगार खेळवित आहे,अशी बातमी मिळाल्याने, तात्काळ म्हाडा कॉलनी येथे गेल्यावर रूमकडे जात असताना,एकजण पळून गेला त्यामुळे अचानक छापा टाकला असता,नऊ जण हे गोलाकार बसुन हातात तीन पाने व चलनी नोटांचा ढिग दिसून आले असून,हे सर्वजण तीन पत्ते खेळत असताना मिळुन आलेले आहेत.
त्यांची झडती घेतली असता,त्यांच्याकडे
विवो कंपनीचे चार,सॅमसंग कंपनीचा एक,अॅपल कंपनीचा एक,नोकिया कंपनीचे दोन,रेडमी कंपनीचा एक,ओप्पो कंपनीचा एक असे तब्बल ६१ हजारांचे मोबाईल हँडसेट आणि त्यांच्या सोबत असलेली नोटांची २१९४० रोख रक्कम रुपये असा एकूण ८२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत आधिक तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment