चक्क..मूकबधिरांनी केली ५७० मूकबधिरांची फसवणूक ,६ जणांना अटक.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 2, 2022

चक्क..मूकबधिरांनी केली ५७० मूकबधिरांची फसवणूक ,६ जणांना अटक.!

चक्क..मूकबधिरांनी केली  ५७० मूकबधिरांची फसवणूक ,६ जणांना अटक.!
पुणे :- नुकताच खळबळजनक प्रकार घडला असूनचक्क मूकबधिरांची फसवणूक करणारे ही काही मूकबधिर च आहे याबाबत मिळालेली माहिती अशी, गुंतवणूक केलेली रक्कम दोन महिन्यात दामदुप्पट करुन देण्याच्या आमिषाने ५७० मूकबधिरांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारे आरोपीही मूकबधिरच आहेत.याप्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. याप्रकरणात आरोपींनी ज्यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा अधिकचे पैसे दिले आहेत त्यांनी अतिरिक्त पोलिसांकडे जमा करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच जे पैसे परत करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे, सुयोग सुधिर मेहता (वय-२३ रा. रायकरनगर, धायरी),
अभिझर सौफउद्दीन घोडनदीवाला (वय -३२
रा. साळुंखे विहार, पुणे), प्रदिप महारुद्र कोलते (वय-२९ रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड), चंचल सुयोग मेहता (वय-३५ रायकरनगर, धायरी), मिहिर संतोष गोखले (वय-३५.सदाशिव पेठ, पुणे), धनंजय सुदामराव जगताप (वय-३५ रा. कात्रज पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हर्षल शांताराम पिंजण(वय -४० रा. देहुरोड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपी सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. या प्रकरणाचा तपास करुन आर्थिक गुन्हे केला आहे. तपासादरम्यान आरोपींनी सुयो अँड अभि एन्टप्रायजेस  व प्लॅटिनियम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स ग्लोबल सोल्युशन नावाने कंपन्या स्थापन केल्या.कंपन्यांचे बँक खात्यामध्ये तसेच स्वत:च्या खात्यात वेगवेगळ्या राज्यातील मुकबधिर व अंध लोकांकडून कोट्यावधी रुपये जमा केले,त्यामध्ये काही रक्कम त्यांनी फॉरेक्स
ट्रेडिंगकरिता  वापरुन काही रक्कम वैयक्तिक खर्चाकरीता वापली.सुरुवातील गुंतवणूक केलेल्या मुकबधिर लोकांना दुप्पट परतवा देण्यासाठी काही रक्कम वापरली. आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूकदारांना आवाहन केले आहे की, या गुन्ह्यामध्ये आरोपींकडून ज्याव्यक्ती,गुंतवणूकदार यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.त्यांनी ती रक्कम या खात्यात डिमांड ड्राफ्ट द्वारे जमा करावी.ज्यामुळे नुकसान झालेल्या गुंतवणूकदार यांना त्यांची रक्कम परत मिळेल.जे गुंतवणूकदार त्यांना मिळालेली अतिरिक्त रक्कम जमा करणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला
आहे.याबाबत अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment