महाराष्ट्राच्या ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता_ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 17, 2022

महाराष्ट्राच्या ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता_

_महाराष्ट्राच्या ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता_

*ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच शाश्वत आनंद लपलेला आहे - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज*

    बारामती (प्रतिनिधी); - ‘‘ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच निखळ शाश्वत आनंद लपलेला आहे.'' असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवारी 13 फेब्रुवारी, 2022 रोजी महाराष्ट्राच्या 55व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहात आपले आशीर्वाद प्रदान करताना केले. 
  आनंदाच्या अवस्थेवर प्रकाश टाकताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जेव्हा आपण ईश्वराशी नाते जोडून त्याच्याशी एकरूप होऊ लागतो तेव्हा भक्तीचा असा काही रंग चढतो, की आम्हाला निरंतर आनंदाची अनुभूती प्राप्त होते. भक्त जेव्हा भक्तीच्या रंगात रंगलेला असतो तेव्हा तो क्षणोक्षणी आनंदाची अनुभूती घेत असतो आणि प्रभुच्या इच्छेमध्ये राहून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारतो. 
‘विश्वास, भक्ति, आनंद’ या तिन्ही पैलुंना जीवनात समान स्थान दिले जाऊ शकते. भक्ताला या तिन्हीवर समान रुपाने चालावे लागेल. हा जीवनाचा उद्देश आहे ज्यामध्ये आपण ईश्वराच्या प्रति पूर्ण समर्पित होऊन भक्ती करुन आनंदाची अवस्था प्राप्त करु शकतो.

*बहुभाषी कवि संमेलन*
‘श्रद्धा भक्ती विश्वास असावा, मनामध्ये आनंद वसावा’ या शीर्षकावरील ‘बहुभाषी कवी संमेलन’ संत समागमाच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले.  या विषयावर आधारित मराठी, हिंदी, पंजाबी, कोंकणी, अहिराणी, भोजपुरी व गुजराती अशा सात भाषांतील एकंदर १८ कविंनी अत्यंत प्रभावशाली शैलीत आपल्या भावना काव्यरुपात प्रस्तुत केल्या. ज्यामध्ये अनेकतेत एकतेचे सुंदर दृश्य आणि वसुधैव कुटुंबकमची अद्भुत छबी दृष्टिगोचर झाली. 
संत समागमाच्या सांगता समारोहातील सद्गुरु माताजींच्या दिव्य प्रवचनाचा आनंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो भाविक भक्तगणांनी मिशनची वेबसाईट व साधना T. V चॅनलच्या माध्यमातून घेतला आणि विश्वास, भक्ती व आनंदाची अनुभूती प्राप्त केली. त्याचबरोबर स्वत:ला या निराकार ईश्वराशी एकरुप झाल्याची दिव्यानुभव प्राप्त केला, जो या संत समागमाचा मुख्य उद्देश होता. 

मिडीया सहाय्यक - अशोक कांबळे
9011296375
   प्रेस विभाग 
संत निरंकारी मंडळ,बारामती

No comments:

Post a Comment