धक्कादायक..पाण्यासाठी अनुसूचित जातीच्या लोकांनी सोडलं गाव..पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 3, 2022

धक्कादायक..पाण्यासाठी अनुसूचित जातीच्या लोकांनी सोडलं गाव..पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना.!

धक्कादायक..पाण्यासाठी अनुसूचित जातीच्या लोकांनी सोडलं गाव..पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना.!
अमरावती :- पाण्यासाठी अनुसूचित जातीच्या लोकांनी सोडलं गाव..पुरोगामी महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना अमरावतीमध्ये घडली आहे.सावंगी मग्रापूर गावात पाण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लोकांनी गाव सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गावात गेल्या २८ दिवसांपासून पाणीपुरवठा केला नाही, असा आरोप दलितांनी केला आहे. अनुसूचित जातीची वस्ती असल्यामुळे उपसरपंचांनी हे
जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.अमरावती जिल्ह्यातील आमदारापासून अधिकाऱ्यांना सर्वांना निवेदन दिले आहे. मात्र, त्यांना पाणीपुरवठा केला नाही. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून अनुसूचित जातीच्या कुटुंबीयांनी गावाच्या बाहेरील विहिरीजवळ ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आम्हाला पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी केला आहे.आमच्या एक नंबरच्या वार्डात पाणीपुरवठा करावा हीच आमची मागणी आहे. तहसीलदार, आमदार आणि सर्वांना निवेदन दिलं. चकरा मारून थकलो. गावापासून
१ किलोमीटरवर विहिर आहे. तिथून पायपीट करून पाणी आणतो. आमच्या वार्डात नळ द्यावे,यावेळी सरपंचांचं यांचं म्हणणं आलं की
२५ ते ३० दिवसांपासून पाणी बंद आहे. त्यांनी पाईप फोडले. त्यामुळे नळ बंद आहेत. आम्हाला आधीच सांगितलं असतं तर आम्हाला नळ सुरू करून द्या, तर आम्ही नळ दुरुस्त करून दिला असता. आता आम्ही नळ सुरू करणार आहोत, असं संरपंच यांनी सांगितलं.तर दुसरीकडे या प्रकरणात स्थानिक भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी गंभीर दखल घेत दोषीवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात तक्रार आली असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून स्थानिक राजकारणामुळे पाण्यापासून कोणाला वंचित ठेवत असल्याने आता गावात टॅकरने पाणीपुरवठा करण्यात
येईल, अशी माहिती आमदार प्रताप अडसड यांनी दिली.या वेळी एका दहा वर्षाच्या मुलीने सांगितले की माझे आई-बाबा शेतात जातात. त्यामुळे मला घरची कामे करावे लागतात. एक किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून पाणी काढून आणते. मी विहिरीत पडली तर जबाबदारी कोण घेईल? असा थेट सवाल १० वर्षाच्या चिमुकलीने केला आहे.पालकमंत्री यशोमती ठाकुरांचं म्हणणंआलं की,विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून पाणी दिलं जात नसेल तर नक्कीच मोठी कारवाई केली जाईल. पण, यापूर्वी याच भागातून एक घटना समोर आली होती. त्यानंतर चौकशी केली असता स्थानिक राजकारणामुळे ते घडल्याचं समोर आली होती. पण, या घटनेची चौकशी आम्ही करू. पण, असे पावले उचलण्यापेक्षा आम्हाला सांगावं, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

No comments:

Post a Comment