भैरवनाथ विद्या धाम लोणी च्या लोणी येथे उत्साहात शिवजयंती साजरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

भैरवनाथ विद्या धाम लोणी च्या लोणी येथे उत्साहात शिवजयंती साजरी..

भैरवनाथ विद्या धाम लोणी च्या लोणी येथे उत्साहात शिवजयंती साजरी..


 लोणी धामणी प्रतिनिधी -(कैलास गायकवाड ):- ता.२०-२-२०२२ लोणी ता. आंबेगाव येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा झाला.भैरवनाथ विद्या धाम लोणी च्या विद्यार्थ्यांनी शिवप्रतिमेची ढोल लेझीम व वादयांच्या गजरात मिरवणूक काढून प्रशालेत  शिवजयंती साजरी केली. विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम च्या गजरात मिरवणूक काढून विविध प्रकारचे खेळ साजरे केले. गावामध्ये तरुणांनी व ग्रामस्थांनी महादेव मंदिरात शिवजयंती साजरी केली. याप्रसंगी शिवव्याख्याते प्रसाद डफळ याचे शिव व्याख्यान पार पडले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी, शिव व्याख्यान स्पर्धा झाली विद्यार्थ्यांनी  चांगल्या प्रकारे सहभाग घेतला. तरुणांनी व ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढली. यावेळी दैनिक सामना चे विठ्ठल जाधव, अंकुश भूमकर, माजी सरपंच दिलीप वाळुंज, उपसरपंच किरण वाळुंज, गुलाब वाळुंज लौकिक खंडागळे, स्वप्निल वाळुंज, प्रतीक कदम,सरपंच सागर जाधव, व्यापारी मच्छिंद्र शेठ वाळुंज तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष शेठ पडवळ, जगन्नाथ लंके, निवेदक सुरेश वाळुंज इत्यादी ग्रामस्थ हजर होते. माध्यमिक प्रशाले प्राचार्य साकोरे सर, डोईफोडे सर, इ शिक्षक वृंदानी उत्कृष्ट नियोजन केले. यावेळी तरुणांनी शिवनेरी वरून शिवज्योत लोणी मध्ये आणली.

No comments:

Post a Comment