पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत धक्काबुक्की करणारा अटकेत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 3, 2022

पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत धक्काबुक्की करणारा अटकेत...

पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत धक्काबुक्की करणारा अटकेत...
शिक्रापूर(प्रतिनिधी) :- सद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होत असताना असेच शिरूर तालुका येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचार्याला एका वाहन चालकाने शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सदर व्यक्तीवर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून संदीप रघुनाथ आदक असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे वाहतूक नियमन करणारे पोलीस शिपाई ज्ञानदेव गोरे हे वाहतूक नियमन करत असताना एम एच १२ एस यु ९७७४ क्रमांकाची स्कोर्पिओ गाडी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होईल या पद्धतीने उभी राहिलेली होती. यावेळी पोलीस ज्ञानदेव गोरे यांनी सदर स्कोर्पिओ गाडीवर ऑनलाईन पद्धतीने दंड आकारात पावती केली. त्यावेळी सदर गाडी तेथून गेली होती. सायंकाळच्या
सुमारास पुन्हा तीच गाडी पुन्हा पाबळ चौकात येऊन उभी राहिली. त्यावेळी वाहनातील चालक उतरुन गोरे यांच्या जवळ आला आणि त्याने गोरे यांना शिवीगाळ, दमदाटी करत माझ्या गाडीची सारखीच का पावती करतो, असे म्हणून शिवीगाळ करत गोरेंना धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या होमगार्ड लखन शिवले, मंगेश गायकवाड,अंतेश्वर यादव यांनी गोरेंना सदर युवकाच्या तावडीतून सोडवीत शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणले. याबाबत पोलीस शिपाई ज्ञानदेव दत्तात्रय गोरे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संदीप रघुनाथ आदक रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे सध्या रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे याचे विरुद्ध सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.

No comments:

Post a Comment