अबब.. पुन्हा बांधकाम विभागातील अधिकारी सापडले लाच घेताना..43.75 लाखांच्या लाचेची मागणी..4 लाख रुपये स्विकारताना बांधकाम विभागातील दोन अधिकार्यांसह पंटर अँटीकरप्शनच्या जाळ्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 23, 2022

अबब.. पुन्हा बांधकाम विभागातील अधिकारी सापडले लाच घेताना..43.75 लाखांच्या लाचेची मागणी..4 लाख रुपये स्विकारताना बांधकाम विभागातील दोन अधिकार्यांसह पंटर अँटीकरप्शनच्या जाळ्यात...

अबब.. पुन्हा बांधकाम विभागातील अधिकारी सापडले लाच घेताना..43.75 लाखांच्या लाचेची मागणी..4 लाख रुपये स्विकारताना बांधकाम विभागातील दोन अधिकार्यांसह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात...                                                                                                           नंदुरबार :- बांधकाम विभागात लाच घेण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे पुढे येत आहे औरंगाबाद नंतर पुन्हा एकदा ठेकेदाराने केलेल्या कामाच्या 8 कोटी 45 लाखांच्या देयकापोटी 43 लाख 75 हजार रुपयाची लाच नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जिल्हा परिषदेच्या  उप उपविभागीय अभियंता
अभियंता आणि खासगी पंटरला नंदुराबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. उप उपविभागीय अभियंता सुनील दिगंबर पिंगळे (वय-48), सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे  (वय 52),खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा(वय-32)यांना 4 लाखाचा पहिला हप्ता घेताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नंदुराबर बांधकाम विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.तक्रारदार (वय-59) हे शासकीय मान्यताप्राप्त नोंदणीकृत आहेत. तक्रारदार यांना जिल्हा परिषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभागामार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची  नवीन इमारत बांधणे,
जलनिस्सारणाची कामे व इतर 45 कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. तक्रारदार यांनी ही सर्व कामे पूर्ण केली आहेत. या कामांबाबत रस्ता सुधारणा,रस्ता येथील जिल्हा परीषद
अक्कलकुवा उपविभागीय अभियंता सुनील पिंगळे, सहाय्यक अभियंता संजय हिरे यांनी तक्रारदारांचे 8 कोटी 45 लाख 89 हजार रुपयांची देय बीले मंजूर केलेल्या बिलांपैकी 7 कोटी 61 लाख 89 हजार रुपये तक्रारदार यांना मिळाली आहे.उर्वरित 84 लाख रुपये रक्कम संबंधित अधिकार्यांनी राखून ठेऊन तक्रारदार यांनाअनामत मुद्दामहुन राखून ठेवल्याचे सांगितले. ही रक्कम मिळावी यासाठी तक्रारदार यांनी रक्कम वेळोवेळी जिल्हा परीषद कार्यालयात पिंगळे आणि हिरे यांची भेट घेतली.
पिंगळे आणि हिरे यांनी यापूर्वी आदा केलेल्या
रकमेच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे लाच
मागितली. यामध्ये पिंगळे याने 30 लाख 50
हजार रुपये व शाखा अभियंता हिरे याने 13
लाख 25 रुपये अशी एकूण 43 लाख 75 हजार रुपयांची लाच मागितली. तसेच ही रक्कम दिली नाही तर उर्वरीत रक्कम तुम्हाला मिळू देणार नसल्याची धमकी दिली. रक्कम देण्याची हमी म्हणून अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्याकडून जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबार 
या बँकेचे 30 लाख 50 हजार व 13 लाख 25
हजार रुपयांचे दोन धनादेश दिनेश यादवराव सोनवणे या ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने लाचेपोटी लिहून घेऊन त्याच्या ताब्यात ठेवले. तसेच रोख रक्कम आणून दिल्यानंतर धनादेश परत देऊ असे तक्रारदार यांना सांगण्यात आले,अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment