चिमकूल्यांनी पारंपारीक पद्धतीने आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांना साक्षात दंडवत घालून प्रदक्षिणा घालून केली प्रार्थना.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 13, 2022

चिमकूल्यांनी पारंपारीक पद्धतीने आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांना साक्षात दंडवत घालून प्रदक्षिणा घालून केली प्रार्थना..

चिमकूल्यांनी पारंपारीक पद्धतीने आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांना साक्षात दंडवत घालून प्रदक्षिणा घालून केली प्रार्थना..                                                            निरगुडसर : (प्रतिनिधी.प्रतिक अरुण गोरडे.):-दिः१३/०३/२०२२. मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी आई वडीलांप्रती आदर,सन्मान,आणि आपूलकी निर्माण व्हावी याराठी प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मातृ-पितृ पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी चिमकूल्यांनी पारंपारीक पद्धतीने आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांना साक्षात दंडवत घालून प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली.व आपल्या आईवडिलांन प्रति कृतज्ञता व्यक्त केली.अध्यात्माची आवड असणारे अजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी सरपंच कोंडीभाऊ आदक, माजी उपसरपंच माधुरी आदक,पिरभाऊ आदक, ग्रामपंचायत सदस्या ज्योती गोरडे,उघोजक विजय आदक,जितेंद्र आदक,रामदास पालेकर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गेणभाऊ बंगे,उपाध्यक्ष रुपाली मांदळे,सुनिल आदक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मूलांना अल्पोहार देण्यात आला.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सखाराम मुंजाळ,किरण नरवडे,बाळसाहेब लोखंडे,सुजाता चिखले व ग्रामस्थांनी केले.या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सखाराम मुंजाळ यांनी केले.

No comments:

Post a Comment