निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट बारामती व इंदापूर तालुक्यात पोहचवला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 10, 2022

निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट बारामती व इंदापूर तालुक्यात पोहचवला...

निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट बारामती व इंदापूर तालुक्यात पोहचवला..
वालचंदनगर:- बारामती निर्भया पथकाने माननीय डी वाय एस पी श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने फडतरे नॉलेज सिटी फडतरे कॉलेज येथील कार्यक्रमास उपस्थित राहून सौ अमृता भोईटे महिला पोलीस हवालदार यांनी तेथील ज्युनियर व सीनियर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना निर्भया पथक म्हणजे काय निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये निर्भया पथक कशा पद्धतीने कार्य करते, वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये त्यांचे अत्याचारास बळी पडू नका याची पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची उदाहरणांसहित माहिती दिली पोक्सो अॅक्ट,तसेच तक्रार कोठे व कशी द्यावी,न घाबरता व्यक्त व्हावे,अन्याय सहन न करता प्रतिकार करावा तसेच मुली व महिलांची सुरक्षितता याबाबत निर्भया पथक सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परंतु नैराश्यात जाऊन जीवन संपून नका जीवन एवढे स्वस्त नाही की ते आपण कोणासाठी तरी संपवावे आई-वडिलांचा गुरुवार्यांचा यांचा आदर करणे समोर योग्य ते ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे वाईट मार्गाला न जाता चांगली संगत धरणे तसेच मुलांना आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर पोलीस चारित्र्य पडताळणी मध्ये तसे प्रमाणपत्र देऊन भविष्यात आपल्याला कुठेही सरकारी नोकरी मिळत नाही तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही याविषयी काळजी घ्यावी अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले डायल 112,100,स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची जास्तीत जास्त मदत घ्यावी असे आवाहन केले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे अध्यक्ष उत्तम दादा फडतरे व त्यांच्या पत्नी सौ उज्वलाताई,सौ शैलजा फडतरे सचिवांच्या पत्नी,
सौ संगीता फडतरे विश्वस्त,
सौ अंकिता फडतरे  प्रमुख पाहुणे सौ. अमृता भोईटे पोलीस हवालदार,सर्व विभागांचे प्रमुख विपुल निंबाळकर,कृष्णकांत ढेकळे कार्य संचालन सौ मनाली काटे,गौरी खलाटे,सौ डोंबाळे,सौ पारेकर असे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment