*जागतीक महिला दिनानिमित्त मंचर पोलीस स्टेशनचा कार्यभार ‘‘सावित्रीचे लेकींचे हाती’’* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 8, 2022

*जागतीक महिला दिनानिमित्त मंचर पोलीस स्टेशनचा कार्यभार ‘‘सावित्रीचे लेकींचे हाती’’*

*जागतीक महिला दिनानिमित्त मंचर पोलीस स्टेशनचा कार्यभार ‘‘सावित्रीचे लेकींचे हाती’’*
लोणी धामणी -(प्रतिनिधी =कैलास गायकवाड):- ता.८/३/२०२२ आज मंचर पोलीस स्टेशन येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत,मंचर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सतीश होडगर यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे दिवसभराचा कार्यभार महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे ताब्यात दिला होता. त्यामध्ये प्रभारी अधिकारी म्हणुन त्यांचे खुर्चीवर महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रूपाली पवार यांना बसवुन संपुर्ण दिवसभर रूपाली पवार यांनी पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार पाहीला. तसेच ठाणे अंमलदार म्हणुन महिला पोलीस नाईक अश्विनी लोखंडे, सीसीटीएनएस प्रणाली महिला पोलीस अंमलदार राधीका वायाळ, आणि मोनिका राक्षे, बारनिषीचे कामकाज महिला पो.अंमलदार शर्मिला होले, काईम कारकुन महिला पो.नाईक निलम शिंदे,  गोपणीय आणि पासपोर्टचे कामकाज महिला पोलीस अंमलदार कांचन पिंजण, तसेच पोलीस ठाणे अंमलदार मदतीनीस आणि डायल ११२चे कामकाज महिला पो. अंमलदार रेशमा गाडगे तर वायरलेसचे कामकाज  महिला पो.अंमलदार मनिशा शेळके, यांनी पाहीले. आज दिवसभरात मंचर पोेलीस स्टेशन येथे भेट देणारे लोकांनी आणि तक्रारदार यांनी आश्चर्य व्यक्त करीत सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे महिला दिनानिमित्त अभिनंदन केले. घर चालविणारे महिला चूल आणि मूल ही संकल्पना मोडीत काढीत आज एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी म्हणून सामाज सेवा करीत आहेत. 
त्यानंतर सायंकाळी ०४-०० वाजता मंचर पोलीस स्टेशन हददीतील सर्व महिला पोलीस पाटील, महिला दक्षताvvकमिटीचे सदस्या, पोलीस स्टेशन मधील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सर्वांचे अभिनंदन करून फेटे बांधुन, आणि गुलाबपुष्प देवुन तसेच केस कापुन स्वागत केले. कार्यक्रमाचे स्वागत महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली पवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता समोरोप आणि आभार प्रदर्षन महिला पोलीस अंमलदार रेशमा गाडगे यांनी केले.

No comments:

Post a Comment