श्री काशीविश्वेश्वर सोसायटी चेअरमन पदी विजय झगडे तर चेअरमनपदी बाळासाहेब गायकवाड यांची बिनवरोध निवड..
बारामती प्रतिनिधी:- श्री काशिविश्वेश्वर विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बारामतीच्या चेअरमन पदी विजय कोंडीराम झगडे तर व्हॉईस चेअरमन पदी बाळासाहेब विश्वनाथ गायकवाड यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली श्री काशिविश्वेश्वर सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती
त्यामुळे चेअरमन पदी विजय झगडे व व्हाईस चेअरमन पदी बाळासाहेब गायकवाड यांच्या यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता
बारामती येथील सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी सर्व संचालक मंडळाची सभा घेऊन झगडे आणि गायकवाड यांची चेअरमन व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याचे जाहीर केले
यावेळी नवनिर्वाचित सदस्य महादेव सखाराम फडतरे प्रदिप शामराव जाधव अनिल बबनराव जामदार अश्विनकुमार माणिकराव सातव भूषण भारत ढवान दत्तात्रय भाऊसाहेब ढवान सोपान कृष्णाजी बोरावके संदीप पोपटराव पवार शिवाजी आबा कांबळे नलिनी दत्तात्रय साळुंके जुलेखा हुसेन काजी संस्थेचे सचिव विजय रामचंद्र शिंदे प्रताप सिंह घाडगे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले या निवडणूक प्रक्रियेसाठी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment