कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारीअभियंता आणि उप अभियंता यांनी 2 लाखाची मागणी केल्याने एसीबीकडून गुन्हा दाखल.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 6, 2022

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारीअभियंता आणि उप अभियंता यांनी 2 लाखाची मागणी केल्याने एसीबीकडून गुन्हा दाखल....

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी
अभियंता आणि उप अभियंता यांनी 2 लाखाची मागणी केल्याने एसीबीकडून गुन्हा दाखल....                                                    पुणे : कृषि उत्पन्न बाजार समिती पुण्यातील मार्केट यार्ड मधील इमारतीच्या स्वच्छतागृहाचे
नुतनीकरण  व उद्योग भवन येथील स्लॅबच्या कामाचे बिल मंजूर  करण्यासाठी 2 लाखाची लाच मागणी करणार्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील  कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी  करण्यात आली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यकारी अभियंता प्रमोद कृष्णराव तुपे, उप अभियंता अरविंद
दामोदर फडतरे  अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन अधिकार्यांची नावे आहेत.याबाबत 26 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील
इमारतीच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण व उद्योग भवन क्र.1 येथील स्लॅबचे वॉटर प्रुफिंगचे काम केले होते.या दोन कामांचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या 15 टक्के रक्कम लाच 
म्हणून मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसबीकडे तक्रार केली.तक्रारदाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुणे एसीबीने 10 ऑगस्ट 2021, 11 ऑगस्ट 2021, 21 ऑगस्ट 2021 आणि 23 ऑगस्ट 2021 रोजी पडताळणी केली.त्यावेळी तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी प्रमोद तुपे आणि अरविंद फडतरे यांनी 15 टक्के रक्कम लाच म्हणून
मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यांनुसार आज (बुधवार) त्यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार यांनी केली.पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा अडनाईक  करीत आहेत.

No comments:

Post a Comment