धक्कादायक..महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाने केली पोलिस ठाण्यातच आत्महत्या..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 28, 2022

धक्कादायक..महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाने केली पोलिस ठाण्यातच आत्महत्या..!

धक्कादायक..महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाने केली पोलिस ठाण्यातच आत्महत्या..! 
सांगली : ऐकावे ते नवलच आता महिला सावकारीचे प्रमाण वाढत असून महिलांना पुढे करून वसुलीचा तगादा चालू असतो यामुळे कर्जदार त्रस्त होत असल्याने टोकाची पाऊलं उचलत असल्याचे दिसत आहे, नुकताच सांगली येथे एका महिला सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने थेट पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  समोर आली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवर या युवकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अतुल गरजे-पाटील असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.याबाबत माहिती अशी, अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर एका महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्याने, ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान आत्महत्येपुर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली असून, ती पोलिसांच्या हातीलागली आहे. ज्यात सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसुलीचा तगादा लावल्याने याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिट्ठीत नमूद केलं आहे. असं पोलिसांनी सांगितलं.दरम्यान, शहर पोलीस ठाण्यातच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment