शिरूर आंबेगाव मध्ये साठवण बंधाऱ्यासाठी 3८कोटी १७लाख ३१हजार रुपये निधी मंजूर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 17, 2022

शिरूर आंबेगाव मध्ये साठवण बंधाऱ्यासाठी 3८कोटी १७लाख ३१हजार रुपये निधी मंजूर

शिरूर आंबेगाव मध्ये साठवण बंधाऱ्यासाठी 3८कोटी १७लाख ३१हजार रुपये निधी मंजूर
----------------------------------------
 आंबेगाव  ( पुणे )तालुका प्रतिनिधी कैलास गायकवाड:- ता.१७ आंबेगाव तालुका जि. पुणे मतदारसंघातील मृद व जलसंधारण विभागातील कामांसाठी, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद मार्फत आंबेगाव व शिरूर शून्य ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या ३६ दरवाजे( गेट ) असलेले साठवण बंधाऱ्यासाठी ३८कोटी १७लाख ३१हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांना सुरुवात होईल. रावडेवाडी, केंदुर, (हाडमळा, माळी मळा )गणेगाव खालसा, सविंदणे, धामारी, वरुडे, पाबळ, १व २,मुखई, कान्हूर, सोनेसांगवी, कवठे यमाई ही शिरूर तालुक्यातील गावे  तर महाळुंगे पडवळ१व २,लोणी, रानमळा, लाखनगाव, निघोटवाडी,वाळुंज वाडी ही आंबेगाव मधील गावे आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमधून ही कामे मंजूर झाली आहेत. या कामामुळे पर्जन्यमान कमी असलेल्या दुष्काळी भागासाठी हे बंधारे वरदान ठरणार असून, दुष्काळी परिस्थिती  कमी होण्यास मदत होईल. मंजूर झालेल्या निधीबाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment