बोलीची रक्कम देवस्थान च्या विकासासाठी : भिवा मलगुंडे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 14, 2022

बोलीची रक्कम देवस्थान च्या विकासासाठी : भिवा मलगुंडे

बोलीची रक्कम देवस्थान च्या  विकासासाठी : भिवा मलगुंडे 

बारामती/जळोची: सालाबादप्रमाणे  या वर्षी बारामती तालुक्यातील जळोची येथील श्री भैरवनाथ यात्रा संपन्न झाली या मध्ये मानाचा श्रीफळ फोडण्याचा मान जळोची विविध कार्यकारी सोसायटी चे माजी चेअरमन व विद्यमान संचालक भिवा ज्ञानदेव  मलगुंडे यांना मिळाला.
या मध्ये बोली लावण्यात आली होती एक लाख पंधरा हजार रुपये ला सदर बोली मलगुंडे यांनी स्वीकारली या वेळी यात्रा कमिटी चे सदस्य ग्रामस्थ व मित्र परिवार  उपस्तीत होते.
सदर बोलीची रक्कम मंदिराच्या विकासासाठी वापरण्यात येऊन भाविकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटी च्या वतीने सदर निर्णय घेण्यात आला.
 कोरोनाच्या काळात दोन वर्षे यात्रा झाली नव्हती या वर्षी नवचैतन्य आहे भैरवनाथ देवावर असलेली श्रद्धा व जळोची परिसराचा विकास होताना भाविकांची संख्या वाढत आहे म्हणून  भाविकांना यानंतरच्या काळात उत्तम सेवा व सुविधा मिळाव्यात व सामाजिक बांधिलकी म्हणून   सदर बोली स्वीकारली असल्याचे भिवा मलगुंडे यांनी सांगितले 
यात्रा कमिटी च्या वतीने मानाचा फेटा बांधून भिवा मलगुंडे यांचा सत्कार करण्यात आला.


No comments:

Post a Comment