केरळ येथेल राष्ट्रीय मास्टर गेम्स असोसिएशन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 27, 2022

केरळ येथेल राष्ट्रीय मास्टर गेम्स असोसिएशन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

केरळ येथेल राष्ट्रीय मास्टर गेम्स असोसिएशन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
********************
 (कैलास गायकवाड)
आंबेगाव तालुका प्रतिनिधी - मंचर ता.आंबेगाव जि. पुणे ता.२६/५/२०२२:-
*केरळ (तिरुवनंतपुरम) येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू हरिश्चंद्र थोरात (चांडोली बु ता.आंबेगाव) यांनी ५००० मीटर चालणे, ४ बाय ४०० मीटर रिले या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तसेच ८०० मीटर धावणे रौप्य पदक, ४०० मीटर धावणे ब्राँझपदक अशी ४ पदके पटकावली, हरिश्चंद्र थोरात यांची जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.*
*तसेच याच गावातील पोपट म्हातारबा थोरात वय ५५ वर्षे यांनी उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक, लांब उडी स्पर्धेत रौप्य पदक, ट्रिपल जम्प स्पर्धेत कांस्य तर ४ बाय १०० स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे.*
*या उत्कृष्ठ कामगिरी करून तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.*

*समवेत शरद बँक संचालक दत्ताशेठ थोरात, खरेदी विक्री संचालक संजयशेठ गोरे, जिजाभाऊ मेंगडे, पोपटराव मेंगडे, भरतशेठ फल्ले, संतोष जाधव, विजय थोरात हे उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment