लोणी -मंचर रस्त्यावर भरदिवसा चोरट्यांनी दागिने पळवले
----------------------------------
आंबेगाव (पुणे )तालुका प्रतिनिधी पियुष गायकवाड ):- दि :१६/०५/२०२२.
लोणी (ता.आंबेगाव ) येथील मंचर लोणी रस्त्यावर उपबाजार समितिच्या जवळ स्वराली ॲक्वा या पाण्याच्या प्लॅन्ट वर बसलेल्या सिंधूबाई बापू सिनलकर ( वय :७०) वर्षे यांचे सोमवार ( दि :१६) रोजी दुपारी एक-दिडच्या दरम्यान चोरट्यांनी अडीच ते तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन मंचरच्या दिशेने पोबारा केला. या संदर्भात समजलेली हकिगत येथील पाण्याच्या प्लॅन्टवर दुपारी एक दिडच्या धरम्यान सिंधूबाई बसल्या होत्या. या वेळी दोन तरुण साधारण ३० ते ३५ वयोगटातील रंगाने गोरे असलेले दोन तरुण तेथे आले. त्यांच्या जवळ काळ्या रंगाची शॅक होती.व ते आजीला सांगू लागले की गावात दिवसा चोरटे आलेत व ते महिलांना लुबडतात व त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.व आपल्या जवळील असलेली पिशवी त्यांनी आजीला दिली व तुम्ही तुमचे गळ्यातील सर्व दागिने काढा व पिशवीत ठेवा.सिंधूबाईने कानातील वेल, कुड्या, गळ्यातील पोत असे अडीच तीन तोळ्याचे दागिने काढले व पिशवीत ठेवले.त्या दोघांनी आजी पाहू पिशवित दागिने ठेवले का असे म्हणून पिशवी घेतली व लागलीच मोटार सायकलवरून मंचरच्या दिशेने पोबारा केला.त्याचक्षणी आजीने आरडा ओरड केली जवळच असणाऱ्या घरातील मूलगा सुरेश सिनलकर आई का ओरडते म्हणून पळत आला.व घडलेला प्रकार आईने मुलाला सांगितला.तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.या संदर्भात सुरेश शिनलकर मंचर पोलिस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल करणार असल्याचे सांगितले. गेल्या बारा तेरा दिवसा पूर्वी सुद्धा अशाच भुरट्या चोरांनी लोणीतील एक खत औजधाचे दुकान फोडले होते ,गावातुनच एक मोटार सायकल चोरीस गेली आहे. या संदर्भात पोलिसांना कुठलाच तपास लागला नाही तोच लोणीत दिवसा चोरीची घटना घडल्या मूळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. _________________________
No comments:
Post a Comment