शारिरीक संबंध प्रस्तापित करण्यासाठी दिले लग्नाचे आमिष ,लग्नाचा आग्रह धरला असता फिनेल पाजून केला मारण्याचा प्रयत्न तर व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी..!
पुणे:- महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढतच चालले असल्याचे अनेक घटनेवरून दिसत आहे अशी नुकताच एक घटना घडली,लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी
शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर या तरुणीने लग्नाचा आग्रह धरल्यावर तरुणाने व त्यांच्या
नातेवाईकांनी फिनेल पाजण्याचा प्रयत्न
केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला
आहे. याप्रकरणी धानोरी येथे राहणाऱ्या ३३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७५/२२) दिली आहे.
त्यानुसार, पोलिसांनी कनिष्क तिवारी (वय
२७), तुषार दहिया (वय २७), अनमोल पोरवाल
(तिघे रा. मध्य प्रदेश) आणि आयुष साडु (रा.
नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १२ जानेवारी ते २१ मार्च २०२२ दरम्यान धानोरीतील कलवड वस्तीत घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कनिष्क तिवारी याने फिर्यादी यांना लग्नाचे
अमिष दाखवून त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध
प्रस्तापित केले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याला
लग्नाचा आग्रह केल्यावर आरोपींनी अश्लिल
भाषेत शिवीगाळ केली. कनिष्क तिवारी याने
फिर्यादीला हाताने मारहाण करुन फिनेल
पाजण्याचा प्रयत्न केला. आमच्याविरुद्ध कोठे
तक्रार केली तर त्यांचेकडे असलेले फिर्यादीचे
फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे
मारण्याची सर्वांनी धमकी दिली, म्हणून गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. पोलीस
उपनिरीक्षक मुळुक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment