'आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा ' त्या नेमकं काय काम करतात? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 12, 2022

'आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा ' त्या नेमकं काय काम करतात?

'आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा '  त्या नेमकं काय काम करतात?
मुंबई:-राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते.
आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्या संदर्भात जनजागृती करणे,सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे,वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने 'आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात.आशा स्वयंसेवक ही गावातील स्थानिक असते. आशा स्वयंसेवकाकडून गावातील आरोग्य विषयक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी नेतृत्व करणे हे योगदान अपेक्षित असते.
 राज्यात किती आशा स्वयंसेवक आहेत?
राज्यभरात साधारण 70 हजार आशा स्वयंसेवक
कार्यरत आहेत.आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1 हजार लोकसंख्येमागे 1आशा स्वयंसेवक नियुक्त आहे तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 1500 लोकसंख्येमागे 1 आशा स्वयंसेवक नियुक्त आहे,आशा वर्कर आदिवासी क्षेत्रात 9523 आशा स्वयंसेवक आरोग्य सेवा देत आहेत. तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक आशा स्वयंसेवक काम करत आहेत.आशा स्वयंसेवकांच्या भूमिका आणि
जबाबदाऱ्या काय आहेत?साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे,
माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे
(उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान,लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदाऱ्या आशा स्वयंसेवकांवर आहेत.
कोरोना साथीत घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का? वयोवृद्ध लोकं कोणत्या घरात राहतात, त्यांना कोणते आजार आहेत का? याचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं, होम क्वारंटाईन असलेला कोरोना रूग्णाला कोणती लक्षणं दिसतायेत याबाबत दररोज माहिती घेणं, आरोग्य केंद्रावर लोकांना
तपासणीसाठी आणणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरण केंद्रांवर मदतीचे काम करणे ही कामं आशा स्वयंसेवकांनी कोरोना काळात केली. महाराष्ट्र राज्य आशा कृती
समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील सांगतात, "आशा स्वयंसेवकांना आरोग्य यंत्रणेशी निगडीत 72 कामे कामे करावी लागतात.यावर त्यांना आधारित 2000 ते 3000 मोबदला
मिळतो. पण कोरोनामुळे इतर 72 कामं करता येणं शक्य नाही. त्यामुळे अधिकचा मोबदला मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता महिन्याचे 1000 रुपयांवर काम करावे लागते आहे. आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी ही आमची मागणी आहे. कोरोना काळात जोखमीचं काम करणाऱ्या अशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. त्याचबरोबर
त्यांना दरमहा 18 हजार रुपये इतके मानधन देण्यात यावं ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात 'आशांचे ऋण विसरता येणार नाही. आशांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सन्मान करावा इतकीच आमची इच्छा
आहे."

No comments:

Post a Comment