पाचगणी, महाबळेश्वर येथे विशाल वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तर संत 'निरंकारी'च्या वतीने विश्व पर्यावरण दिनानिमित्त अभियान संपन्न* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 6, 2022

पाचगणी, महाबळेश्वर येथे विशाल वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तर संत 'निरंकारी'च्या वतीने विश्व पर्यावरण दिनानिमित्त अभियान संपन्न*

*पाचगणी, महाबळेश्वर येथे विशाल वृक्षारोपण, स्वच्छता अभियान  तर संत 'निरंकारी'च्या वतीने विश्व पर्यावरण दिनानिमित्त अभियान संपन्न*

  बारामती - संपूर्ण विश्वामध्ये ‘ विश्व पर्यावरण दिवस’ साजरा होत असताना सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा संत निरंकारी मिशनच्या बारामती शाखे सह सातारा झोन मधील पाचशेहुन अधिक स्वयंसेवक मिळून पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्वतीय ठिकाणी स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान राबविण्यात आल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
    यावेळी पर्यावरण संकटाविषयी नागरिकांना जागृत होण्याची प्रेरणा देण्यात आली.
या कार्यक्रमाला पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर, श्री. मोहन छाब्राजी (संत निरंकारी मंडळ दिल्ली), श्री. मोहन गुंडूजी (प्रचारक मुंबई), श्री. वसंत गौंड जी (प्रचारक मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती
    यावेळी पर्यावरण संकटाविषयी नागरिकांना जागृत होण्याची प्रेरणा देण्यात आली. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटक जास्त संख्येने जातात अशा ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात येते. सध्या आपली पृथ्वी ग्लोबल वार्मिंग च्या संकटाबरोबर सामना करत आहे अशावेळी आपल्याला वृक्षारोपण सारखे अभियान राबविण्याची नितांत गरज आहे ज्याच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत होईल.
   यावर्षी संयुक्त राष्ट्राद्वारे स्वीडन ला ‘ओन्ली वन अर्थ’ या शीर्षकासह 2022 च्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमान म्हणून घोषित केले आहे. पर्यावरणवरील संकटाच्या वेळी प्रदूषणापासून सुटका मिळविण्यासाठी संपूर्ण जग एकसाथ प्रयत्न करत असताना संत निरंकारी मिशनचे हजारो स्वयंसेवक आपल्या खाकी वर्दी, तसेच चॅरिटेबल फॉउंडेशनचा निळा टी शर्ट व टोपी परिधान करून संबंधित शहरातील रहिवाश्यांच्या सहयोगाने वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचे श्री. झांबरे यांनी सांगितले.
    महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, पन्हाळा याठिकाणी  हे अभियान 5 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत राबविण्यात आले. यामध्ये या परिसरातील विविध रस्ते, टेकड्या, धरण परिसर अशा आठ विभागामध्ये विभागणी करून या परिसरामध्ये स्वछता आणि वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.                       
   मिशनचे युवा स्वयंसेवक प्लास्टिक प्रदूषणाच्या थीमवर लघू नाटिकांचे आयोजन करून लोकांना पर्यावरण संकटाविषयी जागृत होण्याची प्रेरणा दिली. त्याचबरोबर नो प्लास्टिक युज, बिट एअर पोल्युशन, स्वछता व वृक्षारोपण विषयी संदेश देण्यासाठी बॅनर घेउन मानवी शृंखला द्वारे देखील संदेश दिला आहे. 
    श्री. झांबरे पुढे म्हणाले, बदलती जीवनशैली, वाढत्या शहरीकरणा मुळे होणारी प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद वापर, बांधकामासाठी टेकड्या पर्वतांचे खोदकाम, वाढते प्रदूषण यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होताना दिसतात. या सगळ्यांना आळा घालण्यासाठी पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सर्वांनी संकल्प केला पाहिजे. संत निरंकारी मिशन 2014 पासून संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे  सहभागी होऊन जागतिक पर्यावरण दिन कृतीतून साजरा करत आहे.

No comments:

Post a Comment