बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाही करून केले एक वर्षासाठी स्थानबद्ध* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 5, 2022

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाही करून केले एक वर्षासाठी स्थानबद्ध**बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाही करून केले एक वर्षासाठी स्थानबद्ध*

  बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील  इसम नामे सुरज उर्फ माऊली सोमनाथ काशीद रा. मेडद तालुका बारामती जिल्हा पुणे  याच्यावरती बारामती तालुका पोलीस स्टेशन , बारामती शहर पोलीस स्टेशन,  वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन . येथे शरीरा विरुद्धचे एकूण 13 गुन्हे दाखल होते. त्यामध्ये भादवि कलम 307 प्रमाणे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.अनेक गुन्हे दाखल होऊन देखील हा व्यक्ती  गुन्हेगारी थांबवत नसल्याने याच्या मुसक्या आवळण्यासाठी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण  व बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे  यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनव जी देशमुख पुणे ग्रामीण यांच्यामार्फत तिने एमपीडीए कायद्याअंतर्गत या गुन्हेगारास एक वर्ष स्थानबद्ध करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता त्यास मान्यता मिळाल्याने या इसमास सुमारे एक वर्षासाठी येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

*बारामती तालुका पोलिस स्टेशन मधून  एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबत आणखी 6 इसमांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत .तसेच बारामती उपविभागातून एकूण 15 प्रस्ताव एमपीडीए कायद्याअंतर्गत पाठवण्यातआलेले आहेत*

*उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे  बारामती विभाग व पोलीस निरीक्षक महेश ढवाण  बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी आवाहन केले आहे की जर एखादा गुन्हेगार शरीरा विरुद्ध चे गुन्हे, मालमत्ते विरुद्ध चे गुन्हे, किंवा अवैध धंद्या बाबत असणारे गुन्हे  करण्याचे थांबत नसेल तर त्याच्यावरती एमपीडीए कायद्याअंतर्गत कार्यवाही करून त्यास याच प्रमाणे सुमारे एक वर्षासाठी येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध केले जाईल याची दक्षता घ्यावी*.
  सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक  श्री अभिनव जी देशमुख  पुणे ग्रामीण .अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद जी मोहिते बारामती विभाग पुणे ग्रामीण .उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे  बारामती विभाग. पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस अंमलदार राम कानगुडे ,पोलीस हवलदार सुरेश दडस , पोलीस नाईक बापू बनकर,अमोल नरूटे, रणजीत मुळीक ,  पो. कॉ. प्रशांत राऊत  व नितीन कांबळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment