प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दिलेला मलिदा पाण्यात? धाकधूक वाढली.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 22, 2022

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दिलेला मलिदा पाण्यात? धाकधूक वाढली.!

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दिलेला मलिदा पाण्यात? धाकधूक वाढली.!
पुणे:- प्रशासकीय बदल्या तोंडावर असताना राज्यात चालू असलेल्या घडामोडी मुळे अधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावले असल्याचे समजते,शिवसेनेचे शिंदे यांनी सरकारविरोधात बंड केल्यामुळे राज्यातील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे.काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठ्या
आर्थिक उलाढाली झाल्या आहेत. या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. खासकरून पुणे जिल्ह्यात व परिसरात आवडती पोस्टिंग मिळविण्यासाठी पन्नास लाखांपासून ते तीन कोटी रुपयांपर्यंत बोली लागल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.बऱ्याच अधिकाऱ्यांनी मंत्रालयापासून ते मंत्र्यांच्या जवळच्या हस्तकापर्यंत मोठ्या रकमा 'अॅडव्हान्स'
दिल्या आहेत. आता सरकार अस्थिर झाल्याने आपण दिलेले पैसे बुडणार, या भीतीने काही प्रशासकीय अधिकारी मोठ्या 'टेन्शन'मध्ये आले आहेत. पुणे जिल्हा आणि परिसरात महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क या विभागात पोस्टिंग
मिळविण्यासाठी राज्यभरातील प्रशासकीय अधिकारी कायम प्रयत्नशील असतात. कितीही पैसे मोजावे लागले, तरी आपल्याला या परिसरात चांगली खुर्ची मिळावी म्हणून काही मोजके अधिकारी कोटीच्या घरात रकमा देतात.सन 2022-23 च्या वर्षात 30 मेपर्यंत बदल्या होणे
अपेक्षित होते. परंतु, 27 मे रोजी महाविकास आघाडी सरकारने शासन निर्णय काढत 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत, असा निर्णय घेतला.त्यामुळे मागील महिन्यात होणाऱ्या बदल्या अचानक रखडल्या, 20 जूनला विधानपरिषद मतमोजणी झाल्यानंतर राज्यात सत्तांतराचा घोळ सुरू झाला आहे.त्यातच तुमचे पैसे बुडणार नाहीत. बुधवारी होणाऱ्या
मंत्रिमंडळ बैठकीत हा शासन निर्णय रद्द होऊन बुधवारी दुपारीच राज्यातील सर्व बदल्या होतील, असा सांगावा मंत्रालयातून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या शासन
निर्णयावर काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे आपले पैसे बुडणार, या भीतीने अधिकाऱ्यांच्या पोटात अक्षरशः गोळा आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यास ज्या अधिकाऱ्यांनी आता पैसे मोजले आहेत, त्यांचे पैसे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर जे अधिकारी
भाजप नेत्यांच्याही संपर्कात आहे, त्यांच्यामध्ये
आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असल्याने अनेकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment