सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप..
बारामती:- सम्यक विद्यार्थी आंदोलन बारामती च्या वतीने ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निरावागज गावातील अंगणवाडी ते बारावी पर्यंत च्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम नेहमी राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून गरजू विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता त्यांना यावेळी मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, सामाजिक कार्यकर्ते दया दामोदरे, चंद्रकांत माने, सरपंच विद्या दत्तात्रय भोसले, काशिनाथ भोसले, लक्ष्मण तात्या भोसले, विनय दमोदरे, रोहन निकाळजे, कृष्णा भोसले, सुरज भोसले, योगेश भोसले, सोज्वल भोसले, सचिन भोसले, धिरज भोसले, प्रकाश निकाळजे, श्वेता भोसले, बाबू कारंडे, केशव देवकाते तसेच सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment