माऊली (ज्ञानेश्वर) मत्रे यांचं दुःखद निधन.."माऊली" नावाचं वादळ शमले..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 12, 2022

माऊली (ज्ञानेश्वर) मत्रे यांचं दुःखद निधन.."माऊली" नावाचं वादळ शमले..!

माऊली (ज्ञानेश्वर) मत्रे यांचं दुःखद निधन.."माऊली" नावाचं वादळ शमले..!              बारामती(संतोष जाधव):- अचानक मेसेज पहिला,त्यावर लिहलं होतं भावपूर्ण श्रद्धांजली... आणि क्षणभर धक्काच बसला ज्ञानेश्वर(माऊली)मत्रे यांचं दुःखद निधन.. जे दोन दिवसांपूर्वी अचानक छातीत दुखत आहे म्हणून उपचार घेतला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन पुन्हा व्यवस्थित असल्याचे कळाले आणि पुन्हा ऑपरेशन करायचे आहे आणि ऑपरेशन देखील चांगले झाले. पण काय जाणे माऊली हे बरे झाल्याचे समाधान काही मिनिटं राहिले आणि आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला वार्ता कळाली होती बरे आहे आणि अचानक मेसेज फिरत होता भावपूर्ण श्रद्धांजली..अखेर माऊली नावाचं वादळ शमले त्यांनी आपल्या जीवनात खूप सामाजिक कार्यात लोकांना सहकार्य केले होते, कारभारी चालक मालक टेम्पो संघटना चे ते आधारस्तंभ, मार्गदर्शक होते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हातगाडी नंतर टेम्पो चालवून त्या व्यवसायातून एक जाळ तयार केले होतं, नेहमी सर्वांशी आपुलकीने वागत तर त्यांचे मित्र परिवार हा पत्रकार असो,राजकीय पुढारी असो, की एखादे हमाली करणारे लोक असो ते नेहमी हसतमुख बोलायचे त्यांना चहा पिण्यास न्यायचे हा त्यांचा नित्याचाच उपक्रम असायचं मित्र परिवार मोठा केला होता तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी बारामती मध्ये येणार की यांची लगबग सुरू होयची सर्व टेम्पो चालक मालक व मी एकत्र येऊन पालखी चं आगमन बारामतीत असायचं त्यादिवशी दोन तीन हजार वारकरी भक्तांना जेवणाचं नियोजन करायचो असे कित्येक वर्षे असा महाप्रसादाचा उपक्रम  माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली होत आला त्यांना अशी आवड होती आणि ते काही करून पूर्ण करीत असे कोणतीही अडचण आली तरी ते स्वतः उभे राहत होते, त्यांचा अचानक जाण्याने भिगवण चौक मधील शान गेली म्हंटले तर वावगे ठरणार नाही, योगायोगाणे याच महिन्यात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होत आहे आणि याच महिन्यात त्यांचा दुर्देवी मूर्त्यु झाला आणि आम्हा सर्वांच्या जीवाला चटका लागून गेला खऱ्या अर्थाने विठुरायाच्या चरणी आपला प्राण समरप्रित केला असेल कारण त्यांच्या नावात माऊली होतं ते "त्या माऊलीची कृपा" असे नेहमी म्हणायचे तसे त्यांनी आपल्या  टेम्पोवर देखील लिहिलेलं आहे, अश्या या माऊली(ज्ञानेश्वर) मत्रे यांच्या बद्दल काय लिहावं तेच कळत नाही त्यांनी सामाजिक आपुलकीचा ठसा जनमानसात उमटविला आहे, 'माऊली' हे नाव कायम अजरामर राहील अश्या या माउलीला सर्व मित्र परिवार, कारभारी टेम्पो चालक मालक संघटना बारामती यांच्या वतीने पुनःश्च भावपूर्ण श्रद्धांजली..!

No comments:

Post a Comment