नग्न अवस्थेमधील फोटो मोबाईलमध्ये काढून डॉक्टरने केला अल्पवयीन युवतीवर बलात्कार. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 7, 2022

नग्न अवस्थेमधील फोटो मोबाईलमध्ये काढून डॉक्टरने केला अल्पवयीन युवतीवर बलात्कार.

नग्न अवस्थेमधील फोटो मोबाईलमध्ये काढून डॉक्टरने केला अल्पवयीन युवतीवर बलात्कार...
 पुणे :- डॉक्टर हा देवमाणूस म्हणून ओळखला जातो(मालिखेतला नव्हे)त्याच्या कडे आदराने पाहिलं जातं, पूर्ण विश्वासाने महिला रुग्ण उपचारासाठी तपासून घेत असतात पण काही विकृत प्रऊतीच्या डॉक्टर मुळे इतर चांगल्या डॉक्टर चे नाव खराब होत आहे, अशीच एक घटना घडली,मणक्याच्या आजारावर उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन
मुलीशी जवळीक साधून तिच्यावर डॉक्टरने
बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी डॉ. योगेश लक्ष्मण वाल्हे  (वय ४५, रा. अमोल एनक्लेव्ह कोटकर लेन, भाऊ पाटील रोड, औंध) याला अटक केली आहे. याप्रकरणी शिवतीर्थनगर येथे राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु.रजि. नं. १६१/२२) दिली आहे. हा प्रकार १० नोव्हेबर २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान श्री
अॅक्युपंक्चर पौड रोड व फिर्यादीच्या घरी घडला.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी या अल्पवयीन असताना मणक्याच्या आजारासाठी डॉ. वाल्हे याच्या क्लिनिकमध्ये गेल्या होत्या.यावेळी तिच्या वयाचा गैरफायदा घेऊन डॉक्टरने तिच्याशी जवळीक साधत अंगाला स्पर्श करुन फिर्यादीला किस केले.मणक्याच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने क्लिनिकमध्ये तिच्या मर्जीविरुद्ध
जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.तिचे नग्न अवस्थेमधील फोटो मोबाईलमध्ये काढले.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे फोटो
सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
देऊन शारीरीक संबंध केल्याने गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. सहायक पोलीस
निरीक्षक खेतमाळीस तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment