अधिकाऱ्यांची टक्केवारी वाढतच चाललीय, बांधकाम विभागाचे अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात,सापडला 1 कोटी 44 लाखाचा खजिना.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 26, 2022

अधिकाऱ्यांची टक्केवारी वाढतच चाललीय, बांधकाम विभागाचे अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात,सापडला 1 कोटी 44 लाखाचा खजिना..

अधिकाऱ्यांची टक्केवारी वाढतच चाललीय, बांधकाम विभागाचे अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात,सापडला 1 कोटी 44 लाखाचा खजिना..                                                            नाशिक:- अनेक ठिकाणी कार्यालयात खाजगी पंटर ठेवून अधिकारी टक्केवारी घेत असल्याचे त्या कार्यालयात येत असलेल्या नागरिक बोलताना दिसत आहे, याबाबत लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे सांगण्यात आले, लाचखोरीचे प्रमाणात वाढ होत असून अश्या अधिकारी यांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे, नुकताच लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात 1 कोटी 44 लाखांचा खजिना सापडला,
आदिवासी विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या नाशिकच्या घरातून तब्बल 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरातून 45 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केली आहे.नाशिक आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणांहून 1 कोटी 44 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.याशिवाय अद्यापही बागुल यांच्या अनेक घरांत झाडाझडती सुरू असून पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात आहे. नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचे अभियंता दिनेशकुमार
बागुल यांना 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात काल पकडलं.बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. दीड कोटी रुपयांचे बील मंजूर करण्यासाठी बागूल यांनी ठेकेदाराकडे रकमेच्या 12
टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती.
ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे बागुल यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना बेड्या ठोकल्या.एसीबीच्या 28 लाखांची लाचेची रक्कम जप्त केली.त्यानंतर नाशिक एसीबीच्या छापेमारीत आतापर्यंत  करोडो रुपयांची रोकड सापडली आहे. तर दिनेशकुमार बागुल यांच्या इतर घरांची झाडती घेतली जाणार आहे. त्यामुळे अधिकची रोकड सापडली आहे. तर दिनेशकुमार बागुल यांच्या इतर घरांची झाडती घेतली जाणार आहे. त्यामुळे अधिकची रोकड जप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच त्यांच्या लॉकरची देखील झडती घेतली जाणार आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने त्याने कोणकोणत्या प्रकरणात पैसे घेतले याचा देखील तपास केला जाणार
आहे.

No comments:

Post a Comment