बारामती लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 1, 2022

बारामती लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार..

बारामती लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार..                                                                                   पुणे:- नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 ऑगस्ट पुण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच पुण्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्याच्या सासवड होणार आहे.पवारांच्या बालेकिल्यात पहिली सभा होणार असल्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलं आहे.बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक समस्या जाणून घेणार आहेत. त्यात पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न देखील महत्वाचा असणार आहे. या सभेला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे,सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील
उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदार संघात ही सभा असल्याने सभेची चांगलीच चर्चा होत आहे.या सभेत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील उपस्थित असणार आहे. आता मात्र सासवडमध्ये पवारांच्या बालेकिल्ल्यात येवून ते नेमकं कोणावर
निशाणा साधणार आणि कोणता नवा डायलॉग बोलणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सभेनंतर ते पुण्यात फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करणार आहेत. तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेते पुणे दौऱ्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतात.सत्तेसाठी साकडं घालतात. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय साकडं घालणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.पुणे जिल्हातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडून नवे पद देण्यात आले आहेत. किरण साळी, विजय शिवतारे,रमेश कोंडे, अजय भोसले, नाना भानगिरे या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या. रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी,अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी तर किरण साळी यांची युवासेना सचिवपदी नियुक्ती केली. युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी केल्याने ठाकरे
सरकारला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जागी आता किरण साळी यांची युवासेना राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पुण्यात येणार असल्याने या सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.बारामती लोकसभा संघात कोणती तोफ डांगणार याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment