शालेय डान्स ऑलिंपिक स्पर्धेत पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित 'मनोरमा मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल' मधील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

शालेय डान्स ऑलिंपिक स्पर्धेत पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित 'मनोरमा मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल' मधील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग...

शालेय डान्स ऑलिंपिक स्पर्धेत पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित 'मनोरमा मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल' मधील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी  सहभाग...                                                                                     केडगाव प्रतिनिधी (नवनाथ खोपडे):-दिनांक 1 व 2 ऑगस्ट रोजी गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अंतर्गत शालेय डान्स ऑलिंपिक स्पर्धेत पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित 'मनोरमा मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल' मधील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला होता.
   या स्पर्धेत कुमारी नेत्रा महेंद्र शितोळे इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनीने एकल  लोक नृत्य (सोलो डान्स) स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळविले व कुमारी निराली प्रवीण लोंढे इयत्ता नववी या विद्यार्थिनीने ही एकल लोक नृत्य स्पर्धेत (सोलो फोक डान्स) चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तसेच समूहनृत्यामध्ये ही तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेचा मान वाढविला व या यशामध्ये मोलाचा वाटा असलेले नृत्य प्रशिक्षक माननीय रॉबिनसन विजय मंगलम यांचाही उत्तम नृत्य मार्गदर्शक म्हणून पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
    केडगाव सारख्या लहान व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यशाची एक नवी सुरुवात केली आहे व इतर विद्यार्थ्यांना उत्तेजन देऊन प्रोत्साहित केले आहे. समूह नृत्यांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे-
कुमार हरीश मनोज येळे,कुमार अथर्व संतोष  भंडलकर , कुमार रुद्र चंद्रकांत आहेरकर, कुमार रुद्र किरण बारावकर, कुमारी श्रेया सनी गुंदेचा, कुमारी अनन्या महादेव पाडुळे, कुमारी श्रावणी राजेंद्र गायकवाड व कुमारी निराली प्रवीण लोंढे
     या स्पर्धेमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या संचालिका माननीय लोरेन  अनिल फ्रान्सिस मॅडम यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळा व्यवस्थापन अधिकारी माननीय लता राजीव मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका माननीय सुजाता हिवाळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment