रिक्षा चालकांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 5, 2022

रिक्षा चालकांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन*

*रिक्षा चालकांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन*
  
   बारामती - (प्रतिनिधी):-ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने राज्यभरातील ऑटो रिक्षाचालकांमध्ये रोष वाढत आहे. याच विषयावरून राज्यातील ऑटो रिक्षाचालक संघटनांच्या प्रतनिधींची शनिवारी मुंबईत राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत महामंडळाच्या स्थापनेसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
     सदरची परिषद ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष श्री.शशांक राव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. 
   सदर परिषदेला बारामती दौंड इंदापूर रिक्षा कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत नाना सातव, दौंड रिक्षा कृती समितीचे अध्यक्ष भीमराव मोरे सर, इंदापूर रिक्षा कृती समितीचे अध्यक्ष अनिल चौगुले, दादा शिंदे, उत्तम लोंढे, बाबा कोरे, अण्णा समिंदर यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतुन बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते. 
    याप्रसंगी सांगलीचे माजी. आमदार स्व.आप्पासाहेब उर्फ संभाजीराव पवार यांचे चिरंजीव पृथ्वीराजभैय्या पवार म्हणाले की, रिक्षा चालकांच्या विविध समस्यां बरोबरच गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कल्याणकारी मंडळाच्या मागणी करीता मी सदैव आपल्या सोबत असुन रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभे करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
   त्याच बरोबर राज्यातील विविध जिल्ह्यांतुन आलेल्या पदाधिकार्यांनीही आपल्या समस्या व्यक्त करताना स्थानिक पातळीवरील प्रश्नां बरोबरच संपूर्ण राज्यातील प्रश्नांवर ही आपली मते व्यक्त केली.
   सतत होणाऱ्या इंधन दरवाढीचा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत असुन या बाबत शासनाने लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात तसेच मिटर दरवाढ करण्यापेक्षा रिक्षा चालकांना इंधनदरात सवलत मिळावी जेणेकरून सर्वसामान्य जनतेवर भार पडणार नाही अशी भुमिका विदर्भ फेडरेशनचे अध्यक्ष श्री.विलासजी भालेकर यांनी मांडली. 
    यावेळी, इंदापूर दौंड बारामती रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष.प्रशांतनाना सातव, प्रा.भिमराव मोरे जेष्ठ नेते शंकर साळवी साहेब, गफारभाई नदाफ  कराड,
 नवीमुंबई रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस सुनील बोर्डे खजिनदार विजय पाटील, मल्हारी गायकवाड, कल्याण, फिरोजभाई मुल्ला अजित पाटील सांगली, सलीमभाई मुल्ला, तान्हाजी मसलकर, महिपती पवार सोलापूर, इलियास खान लोधी,शाकिर खान अकोला, दिपक गरड, मन्सूर नदाफ सातारा, राजु इंगळे, जावेद शेख नागपूर, अहदबाबा नांदेड, नरेंद्र वाघमारे, कमलाकर ठाकुर, किसना म्हात्रे पनवेल रायगड यांनी आपली मते व्यक्त केली.         
   श्री.शशांक रावसाहेब यांनी आपली भुमिका स्पष्ट करताना सांगितले की, रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर वेळोवेळी पाठपुरावा करुनही सरकार आपली दाद घेत नसेल तर आपल्याला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल कल्याणकारी मंडळ, रिक्षा परवाना बंद करणे, रिक्षा चालकांना आर्थिक मदत या मागण्या आपण सतत शासनाकडे करत असताना अलिकडच्या काळात शासनाने रिक्षाच्या दंडात भरमसाठ दरवाढ केल्याने रिक्षा चालकावर नामुष्की ओढवली आहे, सतत होणारी इंधन दरवाढीची झळ रिक्षा चालकांना बसते आहे रॅपीड बाईक बंद करण्याचे आश्वासन देऊनही त्या बंद होत नाही एकिकडे रिक्षा चालकांवर छोट्या छोट्या कारणांवरून कारवाई केली जाते परंतु अवैध प्रवासी वाहतूकीवर मात्र कारवाई होत नसल्याने अनेक शहरांमध्ये अवैध वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.परिणामी भविष्यात रिक्षा व्यवसाय मोडीत काढण्याची शक्यता आहे. म्हणुनच सरकारचा हा डाव उधळून लावायला हवा या करीता महाराष्ट्रातील तीन लाख रिक्षा चालकांची एकसंघ ताकद सरकारला दाखवुन देणे गरजेचे आहे त्या करीता प्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवुन जनजागृती करण्याचे काम मी आणि आपले प्रमुख पदाधिकारी करतील तत्पूर्वी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुका आणि गाव पातळीवरील संघटना पदाधिकार्यांशी संपर्क साधुन त्यांना आपली भुमिका समजून सांगायला हवी जेणेकरून शेवटच्या घटकांपर्यंत आंदोलनाची माहिती होईल.
    सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नवीमुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीचे संस्थापक श्री.मारुती कोंडे यांनी केले

No comments:

Post a Comment