बारामतीत मारहाण करणारे सावकार व त्यांचे पंटर वर गुन्हा दाखल. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 25, 2022

बारामतीत मारहाण करणारे सावकार व त्यांचे पंटर वर गुन्हा दाखल.

बारामतीत मारहाण करणारे  सावकार व त्यांचे पंटर वर गुन्हा दाखल.

बारामती:- बारामती या ठिकाणी गणेश मार्केटमध्ये अभिजीत पुष्कराज टाटिया वय 36 वर्ष राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम जवळ ताटिया निवास. यांचा गाळा नंबर 27 मध्ये छोटासा किराणा मालाचा व्यवसाय आहे 2018 साली त्यांना व्यवसायासाठी पैशाची आवश्यकता होती त्यावेळेस निरावागज चे विजय देवकाते यांनी त्यांची ओळख त्याच गावात राहणारे अवैध सावकार कुंडलिक काळे यांच्याबरोबर करून दिली. त्यांच्याकडून पाच टक्के व्याजाने चाळीस हजार रुपये. घेतले कारण म्हणून त्यांनी बारामती अर्बन बँकेचा चेक सुद्धा त्यांना दिलेला आहे  तेव्हापासून महिन्याला वेळोवेळी त्यांना व्याज दिलेले आहे तसेच हे सावकार त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा व्हाट्सअप वर किराणाची ऑर्डर देऊन तसेच समक्ष येऊन किराणा सुद्धा फुकटमध्ये घेऊन जात होते. आत्तापर्यंत 40 हजाराच्या बदल्यात त्यांना 39 हजाराचा किराणा व 1.27लाख रुपये रोख दिलेले आहेत तरीसुद्धा अद्याप त्यांची व्याजाची मागणी थांबलेली नाही.
काल सायंकाळी कुंडलिक काळे हे टाटिया यांच्या दुकानात आले व त्यांनी दोन महिन्याचे राहिलेले व्याजाचे दहा हजाराची मागणी केली त्यावेळेस टाटिया यांनी त्यांना सांगितले की आता मुद्दल व व्याज फिटले आहे तेव्हा कुंडलिक काळे यांनी त्याचा मुलगा अक्षय काळे याला बोलून घेतले आणि म्हणाला की हे लोक व्याज देत नाही नंतर अक्षय काळे हा त्याचे आणखी तीन पंटर लोकांना सोबत घेऊन दोन मोटरसायकलवर टातिया यांच्या किराणा मालाच्या दुकानात आले व या सर्वांनी अभिजीत टातिया व त्यांचे वडील पुष्कराज ताटे यांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर दुकानांमध्ये मारहाण केली व पैशाची मागणी केली हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत त्यानंतर टाटिया यांनी पोलीस ठाण्यात येऊन आज तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीनुसार 143 147 149 323 व सावकारी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशाने अन्वये कल्याण खांडेकर हे करत आहेत.

No comments:

Post a Comment