मा.संजयजी भोकरे नेतृत्व घडवणारे वस्ताद... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 25, 2022

मा.संजयजी भोकरे नेतृत्व घडवणारे वस्ताद...

मा.संजयजी भोकरे नेतृत्व घडवणारे वस्ताद...
                                                                   मुंबई:- महाराष्ट्रातही जागतिकी करणानंतर वृत्तपत्राबरोबरच विविध प्रकारची प्रसारमाध्यमे विकसित झाली. वृत्तपत्र व्यवसायात भांडवलदार, मोठे उद्योग समूह आल्याने शहर, जिल्हा, तालुका पातळीवर वृत्तपत्रांची संख्या वाढल्याने या क्षेत्रात काम करणार्या माध्यमकर्मींचा एक मोठा घटकच तयार झाला. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून, समाजातील सर्व घटकांचे  प्रश्‍न  राजकीय  व्यवस्थेसमोर मांडणार्‍या आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झगडणार्या माध्यम क्षेत्रालाही विविध प्रश्‍नांना सामोरे जावे लागते.
लघु वृत्तपत्र चालकांसह, माध्यमकर्मींना  तर  अनेक  समस्यांचा सामना करावा लागतो. पत्रकारांना मिळणारा तुटपुंजा पगार, नाममात्र मानधन यामुळे, बाहेरून असलेले या क्षेत्राचे आकर्षक प्रत्यक्षात काम करताना किती आर्थीक पातळीवर विदारक आहे याची जाणीव होते. त्यामुळे या माध्यम क्षेत्राचे प्रश्‍न सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असले पाहिजे, काम करणार्यांना  न्याय-सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशाने दैनिक जनप्रवास आणि सांजमहानगरी वृत्तसमुहाचे संपादक संजय भोकरे  हे  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या स्थापने पासुन कार्यरत आहेत. त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन करुन  एकीची वज्रमुठच तयार करत, पत्रकारांना स्वत:हाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रेरीत केले. पत्रकारांची संघटना ही सक्षम असली पाहिजे यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, सांगली, अहमदनगर येथे विभागीय कार्यालयाची स्थापना करुन राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये संघटनेची स्वतंत्र कार्यालये उभी केली. 
राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरात पत्रकारांचे संघटन असणारी आणि माध्यम क्षेत्रातील सर्व घटकाला अडचणीच्या काळात मदत करणारी राज्य पत्रकार संघ एकमेव संघटना झाली. राज्यस्तरावरील  दिग्गजांचे सल्लागार मंडळ निर्माण करुन संघटनेची विश्‍वासार्हता अधिक दृढ केली. संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर, गोविंद घोळवे, राजा माने या राज्य अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात संघटनेला सर्वदूर पोहचवून संघटनेचा दबदबा निर्माण केला. संजय भोकरे यांच्या नेतृत्वाने पत्रकारांना स्वतःच्या प्रश्‍नांची जाणीव करुन देत ते सोडवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. दरवर्षी संघटनेचे होणारे राज्य अधिवेशने, विभागवार आणि जिल्हा पातळीवरील मेळाव्यातून पत्रकारांच्या प्रश्‍नांकडे सरकारचे आणि समाजाचे लक्ष वेधले. पत्रकारीतेबरोबरच कला, क्रीडा, चित्रपट, साहित्य या क्षेत्रातील मान्यवरांनाही संघाच्या वतीने सन्मानित करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. बातमी बरोबरच समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी संघटना आपली क्षमता वापरुन मदत करण्याची भूमिका घेते. तंत्रज्ञानातील वेगाने होत असलेला बदल आणि डिजीटल मिडीयाची गरज लक्षात घेऊन संजय भोकरे यांनी संघटनेच्या विभागीय कार्यालयांमध्ये अद्यावत स्टुडीओची निर्मिती करुन संघटनेला अधिक लोकाभिमुख केले आहे. संघटना अधिक सक्षम आणि विचारांचे सहज अदान प्रदान व्हावे. राज्य आणि जिल्हा, तालुका पातळीपर्यंत सर्वांशी संपर्क रहावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पत्रकारांमध्ये विश्‍वास निर्माण करत पत्रकारांचा आवाज बुलंद केला. तर संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात क्षमता असलेल्या अनेक पत्रकारांचे नेतृत्व विकसित केल्याने माध्यम क्षेत्रात नेतृत्व घडवणारे वस्ताद ठरले. त्यामुळेच विधिमंडळ पत्रकारांचा प्रतिनिधी असावा यासाठी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद  सदस्यासाठी संबंध राज्यातील  पत्रकारांमधुन एकमेव भोकरे यांच्या नावाची मागणी झाली. राज्यपालांनी संजय भोकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त केले तर पत्रकारांच्या प्रश्‍नांना न्याय मिळेल असा विश्‍वास आहे. अशा महाराष्ट्राच्या क्रीडा, पत्रकारीता क्षेत्राला समृध्द करणार्या संजय भोकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!.
शब्दांकन : वसंत मुंडे,
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई

No comments:

Post a Comment