7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठी आणि खासगी व्यक्ती 7000 हजार रुपये लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात.. बीड :-महसुल विभागात सर्वात जास्त भ्रष्टाचार होत असल्याचे उघड होत आहे नुकताच खरेदी केलेल्या प्लॉटच्या 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागून 7 हजार रुपये लाच घेताना अंबाजोगाई तलाठी
प्रफुल्ल सुहासराव आरबाड (वय-30) आणि खासगी व्यक्ती नजीरखान उमरद राजखान पठाण यांना बीड लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. बीड एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरातील शीतल बीअर बारच्या समोरील रोडवर केली.याबाबत 46 वर्षाच्या व्यक्तीने शुक्रवारी (दि.23) बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी प्रफुल्ल आरबाड यांच्याकडे कागदपत्रे सादर केली
होती. तक्रारदार यांना टॅक्स पावती न देता 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी आरबाड यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी बीड एसीबीकडे तक्रार केली.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता,तलाठी आरबाड याने 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. आरबाड याने खासगी व्यक्ती पठाण याच्या सह दुचाकीवर बसून तक्रारदार यांना त्यांच्या पाठीमागे येण्यास सांगून शीतल बिअर बारच्या समोरील रोडवर गाडी थांबवली.आरबाड याने दुचाकी वर पाठीमागे बसलेले पठाण यांचेकडे पैसे देण्यास सांगितले.पठाण यांनी पंचासमक्ष 7000 रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली व आरबाड यांना दिली. पठाण याने लाचेची रक्कम मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना दोघांना रंगेहाथ पकडले.त्यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस पोलीस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश मेहत्रे यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment