हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ होतोय वायरल.. झाड तोडल्याने पक्ष्यांचादुर्दैवी मृत्यू. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 2, 2022

हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ होतोय वायरल.. झाड तोडल्याने पक्ष्यांचादुर्दैवी मृत्यू.

हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ होतोय वायरल.. झाड तोडल्याने पक्ष्यांचा
दुर्दैवी मृत्यू.
मुंबई :-  माणसात माणूस राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे कारण माणुसकी उरली नाही कि काय अशी घटना घडली,माणूस असो वा प्राणी असो वा पक्षी, प्रत्येकाला स्वतःचं घर हवं असतं. कोणताही जीव दिवसभर कुठेही फिरू शकतो, पण संध्याकाळनंतर त्याला त्याच्या घराची गरज भासू लागते.अशा परिस्थितीत तुमच्या संमतीशिवाय हे घर कोणी तोडलं तर तुम्हाला कसं वाटेल. तुमचं घर तुटलेलं दिसलं तर तुम्ही नक्कीच तुटून पडाल आणि तक्रार कराल. पण ही घटना पक्ष्यांसोबत झाली तर ते काय करणार? ते काहीही करू शकत नाहीत असाच एक हृदयस्पर्शी
व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतो आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही अश्रू अनावर होतील.  हा व्हिडिओ कुठला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. पण हा व्हिडिओ निंदनिय असून तो नक्कीच प्रत्येक मानसाला त्याच्या कृतींबद्दल विचार करायला भाग पाडतो. विकासाच्या नावाखाली पशू-पक्ष्यांची घरे हिसकावून घेत आहेत.पशु-पक्षाचा विचार होत नाही तिथे माणसाचा विचार होईल का हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.?

No comments:

Post a Comment