भिगवण रोड कॅनॉल पूल पाडल्याने झाला रस्ता बंद.. विद्यार्थी व नागरिकांचे होताहेत हाल,पर्यायी रस्त्याची मागणी..! बारामती(संतोष जाधव):- भिगवण चौक ते एमआयडीसी रोड च्या रस्त्यावरील कॅनॉल च्या पुलाचे काम चालू आहे, चांगली गोष्ट आहे बारामतीच्या वैभवात काहीतरी चांगले काम होत आहे,परंतु हे पुलाचे काम करीत असताना या रस्तावरून(पुलावरून)शाळेत व कॉलेजला जाणारी मुले,एम आय डी सी कडे जाणारे कामगार,स्थानिक रहिवाशी,रेल्वे स्टेशनला जाणारे प्रवासी व बागेत फिरायला जाणारे व्यक्ती व इतर कामासाठी जाणारी, येणारी नागरिकांना मात्र या पुलाच्या कामामुळे जाण्या येण्याचा रस्ता बंद झाल्याने त्रासदायक झाला आहे, लांबून या ठिकाणी वळसा मारून यावा लागत असल्याने त्रास होत असल्याचे अनेक पालक वर्गातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असताना तसेच किमान शाळेत व कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन पुलावरून ये जा करण्यासाठी रस्ता खुला करणे गरजेचे आहे पण तसे न करता पूर्ण रस्ता बंद केल्याने नागरिकांच्या होणारी अवस्था काय होत आहे हे प्रत्यक्ष या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना विचारल्यास लक्षात येईल.पर्यायी नियोजन न करता पूल पाडून रस्ता बंद करणे नक्की काय उद्देश आहे हे समजो न समजो मात्र बारामतीतील नागरीक व विद्यार्थी यांचे हाल होतायत हे मात्र नक्की, आणि ते हाल अजून किती दिवस, महिने भोगायचे हे येणारा काळच सांगेल.
Post Top Ad
Friday, September 23, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
भिगवण रोड कॅनॉल पूल पाडल्याने झाला रस्ता बंद.. विद्यार्थी व नागरिकांचे होताहेत हाल,पर्यायी रस्त्याची मागणी..!
भिगवण रोड कॅनॉल पूल पाडल्याने झाला रस्ता बंद.. विद्यार्थी व नागरिकांचे होताहेत हाल,पर्यायी रस्त्याची मागणी..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment